महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Big Action : शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना केला अर्ज, 'या' 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची केली मागणी - ठाकरे सरकारवर संकट

शिंदे गटाला शिवसेनेने मोठा धक्का दिला. शिवसेनेकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यात अजून काही आमदारांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Thackeray government crisis
Thackeray government crisis

By

Published : Jun 24, 2022, 11:56 AM IST

Updated : Jun 24, 2022, 3:56 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी ( Rebel Eknath Shinde ) केली आहे. ठाकरे सरकार धोक्यात ( Thackeray government crisis ) आले असून, शिंदे गटाला शिवसेनेने मोठा धक्का दिला. शिवसेनेकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यात अजून काही आमदारांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही आहेत आमदारांची नावे- एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, अब्दूल सत्तार, महेश शिंदे, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, बालाजी कल्याणकर, चिमनराव पाटील, अनिल बाबर, रमेश खैरनारे, बालाजी किनीकर, संदिपान भुमरे, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय रायमुलकर

आमदारांची नावे

३४ आमदारांवर कारवाईची मागणी -सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने ३४ आमदार कारवाईची विनंती करण्यात आली. तसेच ४६ पानांची याचिका विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन त्यातील नमूद ३४ आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. संविधानाच्या अनुछेद १० नुसार कारवाईची मागणी करावी, असे शिवसेनेचे म्हणणे होते.

हेही वाचा -एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे 37 आमदार, सेनेचे आणखी तीन आमदार नॉट रिचेबल

Last Updated : Jun 24, 2022, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details