केंद्रीय मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी ट्वीट करुन लता दीदींच्या आरोग्याबद्दल प्रार्थना केली आहे.
Reactions of Celebrity : लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; मान्यवरांच्या प्रतिक्रिया - devendra fadnavis wishing lata mangeshkar
15:20 January 11
देव लतादीदींना उत्तम आरोग्य देवो - हरदिप सिंग पुरी
15:12 January 11
गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांना लवकर आराम वाटावा - देवेंद्र फडणवीस
गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांना लवकर आराम वाटावा, अशी मी प्रार्थना करतो ! अशा आशयाचे ट्वीट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लतादीदींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
15:11 January 11
संपूर्ण देश तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे - प्रकाश जावडेकर
राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये 'लता मंगेशकरजी लवकर बरे व्हा. संपूर्ण देश तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे' असे म्हटले आहे.
13:47 January 11
लता मंगेशकर लवकर बऱ्या व्हाव्यात - महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणे असून शनिवारपासून त्या ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या लवकर बऱ्या व्हाव्ह्यात अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात जाणार आहे. त्यांना भेटू शकले नाही तरी डॉक्टरांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.