महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thackeray Brothers Dispute : शिंदेंच्या व्यासपीठावर ठाकरेंच्या भाऊबंदकीचा वाद; राजकीय विश्लेषक म्हणतात... - Reaction of political analysts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात जयदेव बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन देत शिंदे यांना शुभेच्छा (dispute Jaydev Thackeray and Uddhav Thackeray) दिल्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर कोणतीही प्रत्यक्ष टीका केली नसली तरी त्यांची व्यासपीठावरील उपस्थितीच उद्धव ठाकरेंना विरोध दर्शवणारी होती मात्र त्यांची उपस्थिती वैचारिक नव्हे तर भाऊबंदकीतून असल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली (Reaction of political analysts) आहे.

Shinde and Thackeray
शिंदे आणि ठाकरे

By

Published : Oct 16, 2022, 3:03 PM IST

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात जयदेव बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन देत शिंदे यांना शुभेच्छा (dispute Jaydev Thackeray and Uddhav Thackeray) दिल्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर कोणतीही प्रत्यक्ष टीका केली नसली तरी त्यांची व्यासपीठावरील उपस्थितीच उद्धव ठाकरेंना विरोध दर्शवणारी होती मात्र त्यांची उपस्थिती वैचारिक नव्हे, तर भाऊबंदकीतून असल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली (Reaction of political analysts) आहे.


ठाकरे घराणे सोबत असल्याचा शिंदेंचा दावा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी येथे घेतलेल्या दसरा मेळाव्यात अत्यंत महत्त्वाचे होते-ते ठाकरे घराण्यातील बाळासाहेब ठाकरे यांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे, बाळासाहेबांची सून स्मिता ठाकरे आणि नातू निहार ठाकरे यांची असलेली उपस्थिती. या उपस्थितीद्वारे शिंदे यांना दाखवून द्यायचे होते की- ठाकरे कुटुंब आपल्या सोबत आहे.

ठाकरे घराण्यातील व्यक्ती इतकाच संदर्भ -उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाचीही अवहेलना केली आहे. त्यामुळे ते अन्य शिवसैनिकांचीही तीच अवस्था करू शकतात. हे दाखवण्याचा या माध्यमातून शिंदे यांनी प्रयत्न केला आहे. मात्र या प्रयत्नांना फारसे यश येणार नाही. कारण शिंदे यांनी व्यासपीठावर जमवलेली ही मंडळी कधीच शिवसेनेची संबंधित अथवा शिवसेना वाढवण्यात त्यांच योगदान नव्हतं. शिवसेना आणि कोणताही राजकीय संबंध नसलेल्या या केवळ ठाकरे घराण्यातील व्यक्ती इतकाच त्यांचा संदर्भ आहे. त्यामुळे त्यांच्या व्यासपीठावरील अस्तित्वाला फारसे महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी दिली आहे.



ही केवळ भाऊबंदकी, वैचारिक समर्थन नाही -जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संपत्तीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. सर्वसामान्यपणे कुटुंबामध्ये दोन भावांमध्ये संपत्तीवरून जसा वाद निर्माण होतो तसाच वाद या दोन भावांमध्ये निर्माण झालेला आहे. भाऊबंदकीमध्ये भाऊ ज्याप्रमाणे वागतात, त्याचप्रमाणे जयदेव ठाकरे यांचे वर्तन आहे म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाऊन शिंदे यांच्या गटाला समर्थन दिले आहे. मात्र असे असले तरी जयदेव ठाकरे यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेला नाही त्यांनी केवळ व्यासपीठावरून त्यांना शुभेच्छा देत समर्थन व्यक्त केले (Thackeray Brothers Dispute) आहे.

स्फोटक विधान-एकनाथला कधीही एकटा नाथ होऊ देऊ नका, अशी विनंती त्यांनी व्यासपीठावरून केली. खरंतर त्यांनी व्यासपीठावरून एक स्फोटक विधानही केलं- शिंदे जे काही काम करत आहेत, ती भल्यासाठी आहेत. त्यामुळे विधानसभा बरखास्त करा. परत निवडणुका घ्या. आणि शिंदे राज्य येऊ द्या, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे जयदेव ठाकरे यांच्या या कृतीला भाऊबंदकीपेक्षा अधिक महत्त्व नाही. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केली आहे.



उद्धव आणि जयदेव यांचा संपत्तीक वाद ?शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मृत्युपत्राबाबत त्यांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे यांनी संशय व्यक्त केला होता. बाळासाहेबांनी संपत्तीचे केलेले वाटप योग्य नाही. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे त्यांचे मृत्युपत्र प्रमाण करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या प्रमाणीकरणालाच जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेत न्यायालयात दावा दाखल केला होता. बाळासाहेब ठाकरे आजारी असताना त्यांची दिशाभूल करून मृत्युपत्र बनवले गेल्याचा आरोप जयदेव ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही बंधूंमधील संपत्तीचा वाद विकोपाला गेला.

कौटुंबिक वादाची किनार -अखेरीस जयदेव ठाकरे यांनी न्यायालयातील आपली याचिका मागे घेतल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली. त्यामुळे या दोन बंधूंमध्ये त्यानंतर वाद अधिकच चिघळला गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे बंधू विभक्त आहेत. तर बाळासाहेब यांच्या जवळच्या मांडल्या जाणाऱ्या सुनबाई स्मिता ठाकरे यांचेही बाळासाहेबांच्या निधनापूर्वी कुटुंबाशी वाद झाले होते. त्याही घरातून आधीच बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही कुटुंबीयांचा शिंदे यांच्या मेळाव्याला असलेल्या उपस्थितीला घराण्याच्या कौटुंबिक वादाची किनार अधिक असल्याची चर्चा उपस्थितांमध्येही होती.

ABOUT THE AUTHOR

...view details