महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Tembhu Upsa Irrigation : टेंभू सिंचन प्रकल्पातील पाणी फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात - जलसंपदामंत्री पाटील - जलसंपदामंत्री जयंत पाटील

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात असून यासंदर्भात महिनाभरात अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या फेरनियोजनाच्या कामाबाबत आमदार अनिल बाबर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. याला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Mar 23, 2022, 5:41 PM IST

मुंबई -टेंभू उपसा सिंचन ( Tembhu Upsa Irrigation ) प्रकल्पातील पाण्याच्या फेरनियोजनाच्या कामाबाबत आमदार अनिल बाबर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, टेंभू उपसा सिंचन योजनेंतर्गत कृष्णा नदीवर बॅरेज बांधून कृष्णा नदीतील पाणी एकूण पाच टप्प्यांद्वारे उचलण्यात येणार आहेत. त्यात सातारा जिल्ह्याच्या ३ गावांमधील ६०० हेक्टर, सांगली जिल्ह्याच्या २०६ गावांमधील ५९ हजार ८७२ हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यातील ३१ गावांमधील २० हजार हेक्टर, अशा २४० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास लाभ देण्याचे प्रस्तावित आहे.

कायम दुष्काळी भागालाही लाभ -कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला या तालुक्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेच्या टप्पा क्रमांक १ ते ५ तसेच पुणदी व विसापूर उपसा सिंचन योजनेची सर्व कामे पूर्ण आहेत. योजनेच्या एकूण ४५१ किलोमीटर लांबीपैकी ४४६ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून कालवे प्रवाहित झाले आहेत. उर्वरित कालवा कामे जून, २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

निविदा काढून पाणी देण्याची व्यवस्था करणार - खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला, माण व खटाव तालुक्यातील अनेक गावे टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रालगत असली तरी सिंचनापासून वंचित आहेत. योजनेच्या उरलेल्या गावात पाणी पोहोचण्यासाठी आवश्यक आराखडा तयार झाला आहे. त्यानंतर निविदा काढून पाणी देण्याची व्यवस्था करणार असल्याचेही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

हेही वाचा -Kirit Somaiya : कोविड सेंटर घोटाळ्याविरोधात किरीट सोमैयांची एस्प्लनेड कोर्टात तक्रार, 'माफिया सेनेला उत्तर द्यावेच लागेल'

ABOUT THE AUTHOR

...view details