मुंबई - महाराष्ट्रातील बँकांची अनुत्पादकता वाढली असून बुडीत कर्जांचे प्रमाणही वाढत आहेत. त्यामुळे अनेक बँकां अवसायनात निघाल्या असून अनेक बँका व सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. आरबीआयने १२ जानेवारी २०२१ रोजी वसंतदादा सहकारी नागरी बँकेचे लायसन्स रद्द करून बँकेवर आर्थिक निर्बंध लादले. यापूर्वी राज्यातील अनेक बँकांना व सहकारी संस्थांना आरबीआयच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे.
आरबीआयचे खातेदारांवर निर्बंध काय?
- एका खातेधारकाला एका खात्यातून आरबीआयने ठरवून दिलेल्या प्रमाणातच रक्कम काढता येते.
- तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी महिन्याला ठराविक रक्कमच खात्यातून काढता येते.
- कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात.
बँकेवर कोणकोणते येतात निर्बंध ?
- रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येत नाही.
- जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येत नाही.
- बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येत नाही.
- नव्या ठेवी स्वीकारता येत नाहीत.
- बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येत नाहीत.
- कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, वीज बिल, प्रिंटिंग, स्टेशनरी, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येतो.
- वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये ठराविक रक्कमेपेक्षा अधिक रक्कम देता येत नाही.
आरबीआयने कारवाई केलेल्याबँका व सहकारी पतसंस्था -
आरबीआयने म्हापसा बँक, सीकेपी को ऑपरेटीव्ह बँक, कराड जनता सहकारी बँकेचे लायसन २०१९ मध्ये रद्द केले होते. याचबरोबर आरबीआयने १०० हून अधिक सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात पुण्यातील रुपी बँक, लक्ष्मीविलास बँक, सांगली सहकारी बँक इ. सामील आहेत. उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँक, नाशिकची विठ्ठलराव विखे-पाटील बँक, कराडची जनता सहकारी बँक यांच्यावरही यापूर्वी अशाच प्रकारे निर्बंध लावण्यात आले आहेत. पुण्याच्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेवर गेली 3 वर्षं आरबीआयनं असे निर्बंध लावले आहेत. ज्या बँका सावरण्याच्या परिस्थितीत नव्हत्या, त्यांचं विलीनीकरण करण्यात आलं. 2007मध्ये सांगली बँक अशाच प्रकारे आयसीआयसीआय बँकेत विलीन झाली होती. पीएमसी बँकेच्या सहा राज्यांमध्ये 137 शाखा आहेत, त्यांचा एनपीए सुमारे पावणे चार टक्क्यांवर आहे. पण अशा अनेक बँका आहेत की ज्या या निर्बंधांतून सावरल्या आहेत.
वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द -
रिझर्व्ह बँकेने उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स १२ जानेवारी २०२१ पासून रद्द केलं आहे. सोमवारी एका निवेदनाच्या माध्यमातून आरबीआयने ही बातमी दिली. १३ जानेवारीपासून या बँकेला कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. आरबीआयच्या या निर्णयाने बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आरबीआयने स्पष्ट केलं आहे, की बँकेचे लायसन्स रद्द करणे आणि दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील. लिक्विडीशनची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदारास ठेवी विमा आणि पत हमी कॉर्पोरेशनकडून नेहमीच्या अटी व शर्तींनुसार, 50 हजारांच्या मर्यादेपर्यंतच्या ठेवीची परतफेड करण्याचा हक्क आहे. आरबीआयने सांगितले की, बँकेच्या बहुंताश ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण परतफेड डीआयसीजीसीकडून मिळेल.
उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेवर आरबीआयने सर्वप्रथम 2017 मध्ये निर्बंध घालून कोणत्याही नव्या ठेवी स्वीकारु नयेत असे निर्देश दिले होते. हजारो ठेवीदारांना केवळ एक हजार रुपये प्रमाणे ठेवी परत केल्या जात होत्या. परंतु बँकेला प्रत्येक वेळी 6 महिन्याच्या मुदतीवर वसुली करून बँकेचा कारभार स्वीकारण्यास संधी दिली होती. पण बँकेच्या व्यवहारात सुधारणा न झाल्याने अखेर आरबीआयने सोमवारी ही कारवाई केली. या बँकेत हजारो ठेवीदारांच्या लाखो ठेवी आहेत.
आता बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठेवीदारांचे पैसे आता परत देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे ठेवीदारांची 5 लाखांपर्यंतची रक्कम ही सुरक्षित आहे. त्यामुळे बँकेतून 5 लाखांपर्यंतच पैसे मिळणार आहेत. वसंतदादा नागरी सहकारी बँकेतील 99 टक्के खातेदारांचे पैसे हे परत देण्यात येणार आहेत.
बँक आॅफ महाराष्ट्रवर कारवाई -
बँकेचे अनुत्पादकता वाढली असून बुडीत कर्जांचे प्रमाण तब्बल 11.76 टक्क्यांवर पोचल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र बँकेवर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए) नुसार कारवाई करत निर्बंध लादले. पीसीएच्या निर्बंधानुसार आरबीआयच्या परवानगीशिवाय नव्या शाखा सुरु करता येत नाहीत. विशेष म्हणजे बँकेच्या उपकंपन्यांमध्येही या कारवाईमुळे गुंतवणूक करता येत नाही. यातील नेमके कोणते निर्बंध लादण्यात आले आहेत याबाबत स्पष्टपणे माहिती मिळू शकली नाही.
पीसीएनुसार कारवाई झालेली महाराष्ट्र बँक ही पाचवी बँक ठरली असून आयडीबीआय, युको, देना, सेंट्रल बँकांवरही अशा प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. अशी कारवाई झालेल्या बँकेच्या कामकाजावर आरबीआयचे काही प्रमाणात नियंत्रण राहते. यासोबतच मोठ्या रकमांची कर्जे देण्यावर बंधने येतात. पीसीएनुसार कारवाईसाठी असलेल्या निकषांपैकी महाराष्ट्र बँकेच्या अनुत्पादित कर्ज अधिक असल्याने कारवाई झाली आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थिती, मालमत्तेचा दर्जा सुधारण्यासोबतच व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सदर निर्बंध लावण्यात आलेल्याचे महाराष्ट्र बँकेने म्हटले होते.
पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध -
२४ सप्टेंबर २०१९ रोजी रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (PMC Bank) सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले. या कारवाईनंतर पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. ग्राहकांना महिन्यातून केवळ एक हजार रुपयेच काढता येणार होत्या. त्यानंतर त्याचे प्रमाण वाढत जाऊन महिन्याला १० हजार व त्यानंतर २५ हजार पर्यंत वाढविण्यात आले.
PMC बँकेच्या कामकाजात अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली होती. पण या अनियमितता नेमक्या कोणत्या, याचा तपशील मात्र जाहीर करण्यात आलेला नाही.
मार्च 2019च्या अखेरीस पीएमसीकडे बँकेकडे 11,617 कोटींच्या ठेवी होत्या तर 8,383 कोटींची कर्जं बँकेने दिलेली आहेत.
निर्बंध लादण्याच्या आठवडा आधी म्हापुसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने त्यांची बँक पीएमसीमध्ये विलीन करायला तत्वतः मान्यता दिली होती. 1984 मध्ये स्थापन झालेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सहा राज्यांमध्ये 137 शाखा आहेत. सन 2000 मध्ये PMCला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाला.
महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात या बँकेच्या शाखा आहेत.
येस बँकेवर आरबीआयची कारवाई -