महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

vande mataram हॅलो नाही वंदे मातरम शासनाच्या नव्या आदेशाला रझा अकादमीचा विरोध

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांनी फोनवर बोलताना हॅलो नाही तर वंदे मातरम बोलण्याचा आदेश जारी केला आहे त्याला रझा अकादमीने प्रचंड विरोध केला आहे

By

Published : Aug 15, 2022, 10:56 PM IST

Updated : Aug 18, 2022, 8:20 AM IST

raza-academy-opposed-to-vande-mataram
संग्रहित छायाचित्र

मुंबईस्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी फोन आल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणणे सक्तीचे करतील, असा आदेश त्यांनी जारी केला आहे. याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. सरकारच्या या वंदे मातरमला आता रझा अकादमीने मात्र विरोध केला आहे.

रझा अकादमी देणार पत्रसुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावरून रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमच्या मुस्लिम समाजात अल्लाह हा एकच देव आहे. आमच्याकडे त्याचीच पूजा होते. आमचा समाज अल्लाहला मानतो. त्यामुळे आता सरकारने वंदे मातरम ऐवजी दुसरा एखादा पर्यायी शब्द द्यावा. तो शब्द आम्हाला सर्व मुस्लिम समाजाला मान्य असेल. सरकारच्या या निर्णयावरून आम्ही लवकरच उलेमा आणि इतर आमच्या मुस्लिम संघटनांची यावर सविस्तर चर्चा करून लवकरच सरकारला याबाबत पत्र देणार आहोत असे रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते मंत्री मुनगंटीवाररविवारीच महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये नव्या 18 मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप करण्यात आले. यात सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री बनल्यानंतर काही मिनिटांनी ही घोषणा केली आहे. इंग्रजी शब्द हॅलोला अलविदा करून स्वदेशी शब्द वंदे मातरमचे पालन करणे हा त्याचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देश स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि त्या अनुषंगाने सरकारी कर्मचारी यापुढे हॅलो म्हणणार नसून वंदे मातरमने दूरध्वनीवरून संभाषण सुरू करतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

आपण 1800 पासून हॅलो म्हणतोयवंदे मातरम् हे केवळ गाणे नसून ते भारतमातेबद्दलच्या भारतीयांच्या भावनेचे प्रतीक आहे. १८७५ साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताने त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांना भुरळ घातली होती. ओ माँ आपको नमन ही भावना व्यक्त करून बंकिमचंद्रांनी अनेकांच्या हृदयात देशभक्तीची ठिणगी पेटवली होती. या रचनेतील प्रत्येक शब्द देशभक्तीची भावना जागृत करतो. 1800 मध्ये टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आम्ही हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करत असल्याचे मुनगंटीवा म्हणाले. परंतु आता महाराष्ट्रातील सर्व कार्यालयातील सरकारी कर्मचारी वंदे मातरम बोलण्यास सुरुवात करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Aug 18, 2022, 8:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details