महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माहुल पम्पिंग स्टेशनच्या बदल्यात बिल्डरला 1 हजार कोटींचा फायदा - रवी राजा यांचा आरोप - अजमेरा बिल्डर

माहूलचे पंपिंग स्टेशन (Mahul Pumping Station) होणे गरजेचे आहे. परंतु, वडाळ्यातील मोक्याची अशी १३०० चौरस मीटर जागा अजमेरा बिल्डरला (Ajmera Builders) देवून त्याला १ हजार कोटी रूपयांचा फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा (Leader of Opposition in the Municipal Corporation Ravi Raja) यांनी केला आहे.

रवी राजा
रवी राजा

By

Published : Dec 5, 2021, 1:31 PM IST

मुंबई -दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मुंबईची (Mumbai) तुंबई होते. पावसाचे पाणी साचल्याने मुंबई ठप्प होते. पावसाचे साचलेले पाणी समुद्रात सोडण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) पंपिंग स्टेशन उभारण्यास सुरुवात केली आहे. यापैकी माहुल येथे पंपिंग स्टेशन (Mahul Pumping Station) उभारण्यास जागा पालिकेला मिळाली आहे. मात्र, या जागेच्या बदल्यात आरक्षणात बदल करून दुसरी जागा एका बिल्डरला दिली जाणार आहे. यामाध्यमातून बिल्डरला १ हजार कोटी रूपयांचा फायदा होणार आहे. ही जागा देण्यास काँग्रेसचा (Congress) विरोध असून, बिल्डरला जागा देण्याऐवजी टीडीआर देण्यात यावा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा (Leader of Opposition in the Municipal Corporation Ravi Raja) यांनी केली आहे.

बिल्डरला जागा देण्यास काँग्रेसचा विरोध
जरासा पाऊस पडला तरी हिंदमाता (Hindmata), माटुंगा गांधी मार्केट (Matunga Gandhi Market), किंग सर्कल (King Circle), सायन (Sion), चेंबूर (Chembur) या भागात पाणी जमा होते. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, चेंबूर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. यासाठी पालिकेला जागा मिळाली असून, त्याबदल्यात वडाळा येथील आरक्षित जागेचे आरक्षण बदलून ती मोक्याची जागा बिल्डरला दिली जाणार आहे. ही जागा देण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. 'माहूलचे पंपिंग स्टेशन होणे गरजेचे आहे. परंतु, वडाळ्यातील मोक्याची अशी १३०० चौरस मीटर जागा अजमेरा बिल्डरला (Ajmera Builders) देवून त्याला १ हजार कोटी रूपयांचा फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वडाळा येथील आरक्षित जागेचे आरक्षण बदलून ती जागा बिल्डरला देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. बिल्डरला जागा देण्याऐवजी टीडीआर देण्यात यावा, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

माहुल पम्पिंग स्टेशनचा मार्ग मोकळा
मलनिस्सारण विभागाचे प्रमुख अभियंता हे मागील अनेक वर्षांपासून माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरिता प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर (Salt Commissioner) खात्याकडे जागा उपलब्ध करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला जात होता, मात्र त्याला यश आले नव्हते. अखेर खाजगी विकासकाकडून जागा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या जागेच्या बदल्यात टीडीआर किंवा अन्य ठिकाणी जागा देऊन माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. माहुल पंपिंग स्टेशनची गरज लक्षात घेता, मौजे आणिक न. भू. क्र. १अ/११ व १अ/१२ या दोन भूखंडांमधील १५५०० चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात घेतली जाणार आहे. महानगरपालिकेच्या भूखंड न.भू.क्र. १अ/१४ मधील १५५०० जागा मे. अजमेरा रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया (Ajmera Reality and Infrastructure India) यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच पालिका आयुक्तांनीही याला मंजुरी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details