महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रवी पुजारीची पोलीस कोठडी 15 मार्चपर्यंत वाढविली - ravi pujari

सरकारी वकिल सुनील गोन्साल्विस यांनी रवी पुजारीच्या पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर रवी पुजारीच्या वकिलांकडून याला विरोध दर्शविण्यात आला. मात्र, रवी पुजारीने स्वतः समोर येऊन सरकारी वकिलांनी मागितलेल्या पोलीस कोठडीला पाठिंबा दर्शविला

रवी पुजारीची पोलीस कोठडी 15 मार्चपर्यंत वाढविली
रवी पुजारी च्या पोलीस कोठडीत 15 मार्च पर्यंत वाढ

By

Published : Mar 10, 2021, 9:53 AM IST

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीची पोलीस कोठडी न्यायालयाने 15 मार्चपर्यंत वाढविली आहे. कर्नाटक पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केलेली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी 15 मार्चपर्यंत वाढवून दिली.
सरकारी वकिल सुनील गोन्साल्विस यांनी रवी पुजारीच्या पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर रवी पुजारीच्या वकिलांकडून याला विरोध दर्शविण्यात आला. मात्र, रवी पुजारीने स्वतः समोर येऊन सरकारी वकिलांनी मागितलेल्या पोलीस कोठडीला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे.
पोलीस कोठडीला रवी पुजारीने दिली संमती
सरकारी वकिलांकडून रवी पुजारीच्या पोलीस कोठडीची मागणी केल्यावर त्याचे वकील डी एस मानेकर यांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शवित मुंबई पोलिसांना रवी पुजारीच्या पोलिस कोठडीतील चौकशीसाठी पुरेसा वेळ मिळाल्याचा दावा केला. मात्र, रवी पुजारीने स्वतः पुढे येत त्याच्याकडे असलेली महत्त्वाची माहिती पोलिसांना द्यायची असल्याने पोलिसांनी मागितलेल्या पोलीस कोठडीला सहमती दर्शविली. त्यामुळे न्यायालयाने रवी पुजारीच्या पोलीस कोठडीत 15 मार्चपर्यंत वाढ केली. दरम्यान, रवी पुजारी याच्यावर मुंबई शहरात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, धमकावणे यासारख्या एकूण 49 गुन्ह्यांची नोंद आहे. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details