महाराष्ट्र

maharashtra

Amruta Fadnavis : मुंबईतील ट्राफिक जाम समस्येमुळे 3% घटस्फोट : अमृता फडणवीस

By

Published : Feb 4, 2022, 3:41 PM IST

Updated : Feb 5, 2022, 2:05 PM IST

बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वादग्रस्त ( Bandatatya Karadkar Controversial Statement ) वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया सामाजिक, राजकीय वर्तुळातून येत आहेत. अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे पुरोगामी विचारांचे असून, आम्ही महिलांचा आदर करतो, असे म्हटले ( Amruta Fadnavis On RSS BJP ) आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

मुंबई :मुंबईतील ट्राफिक जामच्या समस्येमुळे 3% घटस्फोट होतात. त्यामुळे सामान्य नागरिकाप्रमाणे हे सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष हे पुरोगामी विचाराचे आहेत. संघात आणि भारतीय जनता पक्षात स्त्रियांना मान दिला जातो, असं अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis On RSS BJP ) म्हणाल्या.

मानसिकता बदलण्याची गरज

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केलं ( Bandatatya Karadkar Controversial Statement ) होतं. या वक्तव्यावर अमृता फडणीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिपणी करणं चुकीच आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे म्हणत कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे. आपल्या देशामध्ये स्त्रियांनी यादीत खूप त्रास सहन केला आहे. त्यामुळे स्त्रियांबाबत टिप्पणी करणे किंवा त्यांच्या खाजगी आयुष्यावर बोलणे चुकीच आहे. प्रत्येकाने ठरवले पाहिजे की,आपण काय बोलावे आणि काय बोलू नये, असं मत या संपूर्ण प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

एकाला वेगळा, तर दुसऱ्याला वेगळा न्याय

महाविकास आघाडी सरकारच्या ( Maha Vikas Aghadi Government ) संबंधित स्त्रियांवर टीकाटिप्पणी झाल्यास महिला आयोग कडून तात्काळ दखल घेतली जाते. मात्र इतर महिलांबाबत तेवढ्या तत्परतेने दखल घेतली जात नाही. महाविकास आघाडी सरकारचा एकाला वेगळा, तर दुसऱ्याला वेगळा न्याय पाहायला मिळतो अशी खंतही अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबईतील ट्राफिक जामच्या समस्येमुळे 3% घटस्फोट

सामान्य नागरिक म्हणून आपलं मत व्यक्त करते एकतर्फी पद्धतीने महाविकास आघाडी सरकार सरकार चालवत आहे. ट्राफिक जाम, रस्त्यावरील खड्डे, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर राज्य सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. राज्य सरकार केवळ खिसे भरण्याचे काम करत आहे. मुंबईतील ट्राफिक जामच्या समस्येमुळे 3% घटस्फोट होतात. त्यामुळे सामान्य नागरिकाप्रमाणे हे सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं यावेळी अमृता फडणवीस यांनी सांगितले. आपण केलेल्या ट्विटमध्ये जो शब्द वापरला तो शब्द लोकांनीच त्यांना दिला आहे. तसेच नॉटी हा शब्द हा महाविकास आघाडी सरकारमधील एका महिला नेत्यांनी देखील वापरला असल्याचेही ते यावेळी म्हणाल्या आहेत. नाना पटोले यांच्या बाबत केलेल्या ट्विट संदर्भात पत्रकारांनी विचारला प्रश्नाचे उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी हे उत्तर दिलं.

Last Updated : Feb 5, 2022, 2:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details