महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई : गुंगीचे औषध देऊन महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; गुन्हा दाखल - मुंबईत महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार

महिला पोलीस अधिकाऱ्याला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच तिचे अश्लील व्हिडीओ काढून धमकवल्याचेदेखील समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.

raped  on Female police officer in mumbai
मुंबई : गुंगीचे औषध देऊन महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; गुन्हा दाखल

By

Published : Jun 13, 2021, 4:46 PM IST

Updated : Jun 15, 2021, 8:58 AM IST

मुंबई - महिला पोलीस अधिकाऱ्याला फेसबुकवरील मैत्री भोवली आहे. फेसबूकवर झालेल्या मैत्रीतून महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार झाल्याची घटना पुढे आली आहे. तीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच तिचे अश्लील व्हिडीओ काढून धमकवल्याचेदेखील समोर आले आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही काढले -

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. यासंदर्भातील मुख्य आरोपी हा औरंगाबाद येथील राहणारा असूनआरोपीने महिलेला चकाला येथे बोलावले होते. त्यावेळी शीतपेयातून महिलेला गुंगीचे औषध देऊन आरोपीने तीच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही काढले. त्या व्हिडिओच्या सहाय्याने आरोपीने महिलेला धमकी देत तीच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. दरम्यान, आरोपीने या व्हिडीओंचा वापर करून महिलेकडून अनेकदा पैशांची मागणीदेखील केली असल्याचे उघड झाले आहे. या त्रासाला कंटाळून अखेर या महिला अधिकाऱ्यांने पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.

हेही वाचा - ... आणि तो युवक बॉम्ब घेऊन चक्क पोलीस ठाण्यात दाखल झाला, वाचा पुढे काय झालं

Last Updated : Jun 15, 2021, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details