मुंबई - इंधनाचे दर कमी व्हावेत म्हणून सत्ताधारी पक्षांनी मोर्चे काढले. मात्र, आता राज्य सरकार स्वतः व्हॅट कमी करून इंधनाच्या दरांबाबत नागरिकांना दिलासा देत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करून (slash VAT on fuel in Maharashtra) सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी केली. ते मुंबईत रेल्वेच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, की इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय दरावरून ठरत असतात. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पेट्रोलवर दहा रुपये तर डिझेलवर पाच रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर देशातील भाजपशासित राज्यांनीदेखील इंधनावरील व्हॅट कमी ( slash VAT in BJP ruling states) करून जनतेला दिलासा दिला आहे. मात्र, अद्यापही महाविकास आघाडी सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाही.
हेही वाचा-FUEL CESS पेट्रोल-डिझेलवर सेस वाढवून केंद्राने महाराष्ट्राचे ३० हजार कोटी हडपले- नाना पटोले
रेल्वेच्या कामांचे लोकार्पण कार्यक्रम
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील (Minister of State in the Ministry of Railways) यांच्या हस्ते लोकार्पणाचा कार्यक्रम चर्चगेट स्टेशन येथे आज (बुधवारी) पार पडला. यावेळी राज्यातील जनतेला थेट मंत्र्यांकडे आपली तक्रार करता यावी, म्हणून प्रथमच चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच चर्चगेट मरीन लाईन्स आणि चरणी रोड या स्टेशन परिसरामध्ये कार्यरत असलेल्या सीसीटीव्ही आरपीएफ पोस्टचे (CCTV RPF POST लोकार्पण यावेळी करण्यात आले. माटुंगा रेल्वे स्टेशन येथे लिफ्ट, मलाड बोरीवली विरार या स्टेशन मध्ये नव्याने तयार केलेल्या एक्सीलेटर, मुंबई सेंट्रल येथे प्रवाशांसाठी सुविधांनी सुसज्ज असे एसी वेटिंग रूम, प्रवाशांसाठी 1000 रुपयात पॉड संकल्पनेवर आधारित रिटायरिंग रुम, तसेच माहीम बांद्रा खार सांताक्रुज या स्टेशनवर पादचारी पुलाचे लोकार्पण करण्यात (Raosaheb Danve inauguration of rail works) आले. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह रेल्वेमधील अधिकारी उपस्थित होते.