मुंबई -मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणी वसूली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवसायिक गुरुचारणसिंह चौहान यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी देत 17 लाखाची खंडणी वसूल केली आहे. मात्र, अजून पैसे दिले नसल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिसांत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदार गुरुचरणसिंह चौहान यांनी पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक सुनील माने (वाझे प्रकरणात सुनील माने बडतर्फ आहेत.) तसेच पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे. तिघांविरोधात भा.दं.वि.चे कलम 385, 167, 466, 471, 474, 323, 504, 201, 506 (2), 120 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.