हैदराबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यानंतर वीर सावरकरांची बदनामी करण्याची मोहीम असल्याचे वक्तव्य केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या आदेशावरून सावरकरांनी दया याचिका दाखल केल्याचे सांगून नव्या वादाला जन्म घातला.
मला वाटत नाही की गांधी हे राष्ट्रपिता आहेत - रणजीत सावरकर - खासदार असदुद्दीन ओवैसी
वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर म्हणाले, 'मला वाटत नाही की गांधी हे राष्ट्रपिता आहेत. भारतासारख्या देशात एक राष्ट्रपिता असू शकत नाही, असे हजारो लोक आहेत ज्य़ांचे विस्मरण झाले आहे.'
रणजीत सावरकर
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटल्यानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर ओवैसीच्या वक्तव्यावर म्हणाले की, "मला वाटत नाही की, गांधी राष्ट्रपिता आहेत. भारतासारख्या देशाचा एक राष्ट्रपिता असू शकत नाही. हजारो असे आहेत की ज्यांचे विस्मरण झाले आहे."
हेही वाचा - भाजपने व संघाने सावरकरांना पुन्हा-पुन्हा अडचणीत आणू नये. जयंत पाटलांचा टोला