मुंबई - १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणारे यंदाचे केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले असून ते प्रदान देखील करण्यात आले. देशातील १५१ अधिकारी या पदकाचे मानकरी ठरले असून त्यात महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये नवी मुंबईतील लेडी सिंघम असलेल्या सहाय्यकी पोलीस निरीक्षक राणी काळे यांना देखील त्यांच्या उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन गौरविण्यात आले आहे या लेडी सिंघम नवी मुंबई परिसरात अनेक ड्रग्ज माफियांवर कारवाई केली आहे या राणी काळे यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना सांगितले की पनवेल येथील २३३ किलो गांजा जप्त करून दोघांना अटक केली होती त्यांना दोन महिन्यांपूर्वी कोर्टाने दोषी ठरवून १३ वर्षांची शिक्षा आणि १ लाखाहून अधिक दंड आकारला या कारवाईसाठी मला केंद्रीय गृहमंत्री पदक मिळाले असल्याचे राणी काळे यांनी सांगितले
पहिल्या परीक्षेतच यश मिळाले सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या राणी काळे या 2011 मध्ये एमपीएससीद्वारे महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या पहिल्या परीक्षेतच त्यांना यश मिळाले त्यांची पहिली पोस्टिंग पोलीस उपनिरीक्षक म्हणून पुणे शहरात करण्यात आली होती त्यानंतर आता त्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्या मूळच्या इंदापूर येथील असून त्यांचे पती कृष्णा गोरे हे देखील पोलीस दलाचा भाग आहेत कृष्णा गोरे हे सध्या मानपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत आजवर राणी काळे यांना 60 रिवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे शिवसेना नेते दीपक केसरकर गृहराज्यमंत्रीपदी असताना राणी काळे यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट कामकाजासाठी त्यांना 2017 मध्ये गौरविण्यात आलं होत 2018 मध्ये नवे शहर सन्मान पुरस्कार हा राणी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना देण्यात आला होता तसेच आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते देखील राणी काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता