महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana Couple : राणा दाम्पत्य आज बोरीवली न्यायालयात हजेरी लावणार - राणा दाम्पत्य आज बोरीवली न्यायालयात

देशद्रोहाच्या खटल्यासंबंधी आज गुरुवारी राणा दाम्पत्य बोरीवली येथील sedition case Rana couple will be present in Borivali court दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावणार आहे. न्यायालयात हजेरी न लावल्यास अटकेचा वॉरंट निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rana Couple
Rana Couple

By

Published : Sep 15, 2022, 11:51 AM IST

Updated : Sep 15, 2022, 5:02 PM IST

मुंबई -देशद्रोहाच्या खटल्यासंबंधी आज गुरुवारी राणा दाम्पत्य बोरीवली येथील sedition case Rana couple will be present in Borivali court दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावणार आहे. न्यायालयात हजेरी न लावल्यास अटकेचा वॉरंट निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राणा दाम्पत्य न्यायाधीश आर. जी. बागडे यांच्या कोर्टसमोर हजेरी लावणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

राजद्रोहाचा गुन्हा ठरू शकत नाही, सत्र न्यायालयाचं निरीक्षणखासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज्य सरकार विरोधात निःसंशयपणे, भारताच्या संविधानानुसार अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तथापि केवळ अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह शब्द वापरले म्हणून भारतीय दंड संहितेच्या कलम 124 (A) मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींना आवाहन करण्यासाठी पुरेसा आधार असू शकत नाही, असे मत राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सविस्तर निकाल देताना मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एन. रोकडे यांनी निरीक्षण नोंदवले आहे.

सरकारवर टीका पण हिंसेला प्रोत्साहन नाही - आरोपीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या असतील. परंतु IPC च्या कलम 124 (A) अंतर्गत केवळ अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला जाऊ शकत नाही. लिखित किंवा बोलल्या जाणार्‍या शब्दांद्वारे हिंसाचाराचा अवलंब करून सार्वजनिक शांतता बिघडवण्याची प्रवृत्ती किंवा हेतू असेल तरच हे कलम लागू होऊ शकत नाही. सरकारवर टीका पण हिंसेला प्रोत्साहन न देता कठोर शब्द वापरणे हे दंडनीय मानले जाऊ शकत नाही, अशा शब्दात राज्य सरकारला सत्र न्यायालयाने फटकारले आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे गेल्या 13 दिवसांपासून जेलमध्ये होते. हनुमान चालीसा पठनावरून पेटलेला वाद त्यांना जेलवारीपर्यंत घेऊन गेला. त्यानंतर गुरुवारी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मात्र 13 दिवसानंतर जेलमधून बाहेर आले. राणा दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाची सविस्तर ऑर्डर अपलोड झाली आहे. त्यामध्ये न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.

काय आहे प्रकरण -सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरुन राजकारण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला.

दाम्पत्य अटकेत - त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

Last Updated : Sep 15, 2022, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details