मुंबई - राणा दाम्पत्याला ( Rana couple sent to judicial custody ) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणार, अशी घोषणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet rana judicial custody ) आणि आमदार रवी राणा ( Rana couple Bandra court ) यांनी केल्याने शिवसेना विरुद्ध राणा असा सामना रंगला होता. या प्रकरणात राणा ( Ravi rana judicial custody ) दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून शनिवारी अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याची शनिवारची रात्र जेलमध्येच गेली. त्यांना आज दुपारी मुंबईतील बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात ( Rana couple bandra court news mumbai ) हजर करण्यात आले. न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ( Rana couple judicial custody ) आहे. राणा दाम्पत्यांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. 29 एप्रिल रोजी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. नवनीत राणा यांची भायखला कारागृहात, तर रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी होणार आहे.
हेही वाचा -Sanjay Raut on Kirit Somaiya : 'हा खोटारडा माणूस' संजय राऊत यांचा किरीट सोमैयांवर निशाणा
राणा दाम्पत्याला आज दुपारच्या सुमारास मुंबईतील ( Navneet rana News Mumbai ) बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर युक्तिवाद सुरू झाला. सरकारी वकील प्रदीप घरात यांच्याकडून 7 दिवसांची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती. मात्र, राणा दाम्पत्यांकडून अॅड. मर्चंट यांनी युक्तिवाद करत पोलीस कोठडीला विरोध केला. न्यायालयाने अखेर राणा दाम्पत्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा - सरकारी वकील प्रदीप घरात यांनी न्यायालयासमोर सांगितले की, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती प्रदीप घरात यांनी दिली. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, न्यायालयाने ताबडतोब सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. खासदार नवनीत राणा यांची भायखला कारागृहात रवानगी करण्यात येणार, तर आमदार रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.
अॅड. रिजवान मर्चेन्ट यांनी न्यायालयासमोर सांगितले की, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे लोकप्रतिनिधी असून यांना अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 41 ची नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र, पोलिसांकडून राणा दाम्पत्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही. त्यामुळे, राणा दाम्पत्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई ही बेकायदेशीर आहे. तसेच, पोलिसांकडून राजकीय दबावामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे, असा युक्तिवाद नवनीत राणा यांच्या वकिलांकडून आज न्यायालयासमोर करण्यात आला.