महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana Couple Recite Hanuman Chalisa : राणा दाम्पत्याकडून कोठडीत 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण - रवी राणा हनुमान चालीसा पठण

राणा दाम्पत्याला पोलिसांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अटक ( Rana Couple Arrested ) केली. त्यानंतर त्यांनी रात्रभर कोठडीत 101 वेळा हनुमान चालीसाचे वाचन केले ( Rana Couple Recite Hanuman Chalisa )आहे.

Rana Couple
Rana Couple

By

Published : Apr 24, 2022, 10:01 PM IST

मुंबई - 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घोषणेनंतर शनिवारी ( 23 एप्रिल ) हायव्होलटेज ड्रामा घडला. 'मातोश्री'बाहेर आणि राणा दाम्पत्याच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली. त्याचवेळी राणा दाम्पत्याने केलेल्या आव्हानाच्या भाषेने वातावरण तापले. अखेर सायंकाळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अटक ( Rana Couple Arrested ) केली.

अटकेनंतर राणा दाम्पत्याने कोठडीत 101 वेळा हनुमान चालीसाचे वाचन केले ( Rana Couple Recite Hanuman Chalisa ) आहे. रवी राणांनी ट्विट करुन सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केली. त्याप्रकरणी सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या कोठडीत रात्रभर 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण केले, असे त्यांनी म्हटले.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी -मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला वांदे येथील कोर्टात हजर केले. तेव्हा कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वांद्रे कोर्टाचे न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी हा निर्णय दिला. मात्र, 29 एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर फैसला होणारा आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यास 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. नवनीत राणा यांची भायखला कारागृहात, तर रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी होणार आहे.

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा - सरकारी वकील प्रदीप घरात यांनी न्यायालयासमोर सांगितले की, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Home Minister : सोमैयांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज काय ?, गृहमंत्र्यांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details