महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana Couple Non Bailable Arrest Warrant : राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाही; अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची पोलिसांची मागणी - राणे दाम्पत्यावर जामीन अटी शर्तीवर

मातोश्रीवर हनुमान चालिसा प्रकरणात राणा दाम्पत्य ( Rana Couple ) जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत भाष्य न करण्याची अट न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना घातली होती. त्या अटीचे राणा दाम्पत्याने उल्लंघन केले आहे, असा दावा करून पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर राणा दाम्पत्यातर्फे गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार होता. परंतु, ते दोघे किंवा त्यांच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील न्यायालयात उपस्थित ( Bombay Sessions Court ) नव्हते. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली. दोघे एकदाही सुनावणीला उपस्थित राहिलेले नाहीत.

Rana Couple
राणा दाम्पत्य

By

Published : Aug 5, 2022, 11:06 AM IST

मुंबई :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray )यांच्या घरासमोर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) वाचण्याच्या अहवालखासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर झालेल्या ( MP Navneet Rana ) प्रकारानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्य( Rana Couple ) यांच्या विरोधात राष्ट्रगृहाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयाने काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला होता. या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारे याचिकेवर सुनावणीदरम्यान सरकारी वकील यांनी असे म्हटले की, राज्यातील सत्ता परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाही, असा दावा सरकारी वकिलांनी करीत जामीन पात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ( Bombay Sessions Court ) पीएमएलए कोर्टात केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.


जामिनावर बाहेर असताना अटी व शर्तीचे उल्लंघन : राणा दाम्पत्य जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाबाबत प्रसिद्धीमाध्यमांत भाष्य न करण्याची अट न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना घातली होती. त्या अटीचे राणा दाम्पत्याने उल्लंघन केले आहे, असा दावा करून पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर राणा दाम्पत्यातर्फे गुरुवारी युक्तिवाद करण्यात येणार होता. परंतु, ते दोघे किंवा त्यांच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली. दोघे एकदाही सुनावणीला उपस्थित राहिलेले नाहीत.


न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाही : राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोघेही न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत. त्यांना आता कोणीच काही करू शकत नाही, असा त्यांचा समज झाला आहे, असा आरोपही सरकारी वकिलांनी केला. मागील सुनावणीच्या वेळीही राणा दाम्पत्याचा वकील उपस्थित नसल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर राणा दाम्पत्याला न्यायालयाबाबत आदर नसल्याचा सरकारी वकिलांचा दावा चुकीचा असल्याचे सांगून राणा दाम्पत्याच्या वकिलांनी प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली.



या आहेत न्यायालयाच्या अटी : माध्यमांशी बोलण्यास मज्जाव, दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपये भरावे लागणार. पुराव्याशी छेडछाड केल्यास जामीन रद्द, ज्या कारणामुळे त्यांना अटक झाली ती कृती ते परत करू शकत नाहीत. तपास करणारा अधिकारी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलवेल तेव्हा हजर राहावे लागेल. तपास अधिकाऱ्यालाही 24 तास आधी राणा दाम्पत्याला नोटीस देणे बंधनकारक आहे.




काय आहे प्रकरण :सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला.

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण : राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करीत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

प्रसार माध्यमांशी बोलताना अटी व शर्तीचे उल्लंघन : पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती 13 दिवसानंतर त्यांना काही अटी व शर्तीवर मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जाताना प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची जामीन रद्द करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.




हेही वाचा : Varsha Raut summoned by ED : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ६ ऑगस्टला हजर राहण्याचे ईडीचे समन्स

ABOUT THE AUTHOR

...view details