महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana Couple Vs Shiv Sena : राणा दाम्पत्याला अखेर अटक; सकाळपासून मुंबईत रंगले आंदोलन, प्रतिआंदोलनाचे नाटक

राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa read at Matoshree) या मुद्द्यांवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आज (23 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) करणार होते. मात्र, राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला होता. अखेर आज संध्याकाळी राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली (Rana Couple Arrested by Khar Police) आहे.

rana file photo
राणा फाईल फोटो

By

Published : Apr 23, 2022, 9:05 PM IST

Updated : Apr 23, 2022, 10:41 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa read at Matoshree) या मुद्द्यांवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आज (23 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) करणार होते. त्यासाठी आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार होते. मात्र, राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला होता. तर दुसरीकडे राणा यांच्या अमरावती येथील घरावर देखील शिवसैनिकांनी दगडफेक केली होती.

राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक - पंतप्रधान मोदी यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक (Rana Couple arrested by Khar Police) केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आले आहे. उद्या राणा दाम्पत्याला बांद्रा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

राणा दाम्पत्याला अटक करतानाचा व्हिडिओ

राणा दाम्पत्याची शिवसेना नेत्यांविरोधात तक्रार - राणा दाम्पत्याकडून खार पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल ( Rana Couple Complain against Shiv Sena leader ) करण्यात आली आहे. शिवसैनिकांकडून आम्हाला मारण्याचा कट करण्यात आला होता. दरम्यान, शिवसैनिक आमच्या घराबाहेर आंदोलन करत असताना संजय राऊत यांनी ट्वीट करून चिथावनी देण्यात आली. आमच्या जीविताला धोका निर्माण झाला तर याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब हे जबाबदार असतील, असे राणा दाम्पत्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

राणा दाम्पत्याला भेटण्यास मी पोलीस स्टेशनला जाणार - रवी राणा आणि नवनीत राणा यांना भेटण्यासाठी मी खार पोलीस स्टेशनला जाणार आहे. बघू कोण मला अडवते. नवनीत राणा यांच्या घराबाहेर आंदोलन करत होते ते शिवसैनिक नसून, गुंड आहेत. या सरकारचा आता अंत झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिली आहे.

हेही वाचा -Rana Couple Complain Against Shiv Sena Leader : 'शिवसैनिकांकडून आम्हाला मारण्याचा कट'; राणा दाम्पत्याची शिवसेना नेत्यांच्या विरोधात तक्रार

मागील दोन दिवसात काय घडलं..अगदी थोडक्यात -पोलिसांना चकवा देत राणा दाम्पत्य नागपूर मार्गे गुरुवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले होते. याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. तसेच मातोश्रीला सुरक्षेचे कवच दिले होते. तर काही शिवसैनिक हे राणा यांच्या खार येथील घराबाहेर ठिय्या देऊन होते. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानाबाहेर आले होते. मातोश्रीवर कोणाची येण्याची हिंमत नाही. त्यामुळे तुम्ही घरी जा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते. आज(शनिवार) सकाळी राणा दाम्पत्य यांनी फेसबूक लाईव्ह करत आम्ही मातोश्रीवर येणारच असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसैनिक मुंबईतील राणा यांच्या घराबाहेर आक्रमक झाले होते. त्यांनी बॅरिगेट्स तोडत राणा यांच्या घरात येण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच राणा दाम्पत्यांनाि परत अमरावतीला पाठवण्यासाठी त्यांच्या घराबाहेर एक Ambulance देखील तैनात केली होती. दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा रवी राणा यांनी आज दुपारी केली. त्यानंतरही हा वाद सुरूच राहिला. आज संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला नेले. तिथे गेल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केली आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोप -आजच्या या सर्व प्रकरणावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप महिलांना समोर करून श्रीखंडीचे उद्योग करत आहे, हे हिजडेगिरी बंद करा, कोणाच्या तरी पाठबळाने आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्त बसणार नाहीत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केली. याला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा करतात, याची साधी दखलसुद्धा घेतली जात नाही. हनुमान चालीसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर त्यांना थेट तुम्ही अटक करतात, सत्तेचा इतका माज चालणार नाही, असे फडणवीस म्हणाले. राणा दाम्पत्याच्या अटकेवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मुंबई पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर गेले नाही. त्यांनी कायद्याचे पालन केले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याला अटक करणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारकडून जुलमी राजवटीचे काम सुरू आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

हेही वाचा -Navneet Rana Arrest : मुंबई पोलिसांसमोर नवनीत राणा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींना म्हणाल्या...

Last Updated : Apr 23, 2022, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details