ठाणे -महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेत प्रामुख्याने दोन गट पाहायला मिळाले. एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांचा गट तसेच दुसरा उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचा गट. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील आमदार खासदार तसेच शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा ( Support to Eknath Shinde ) दर्शवलेला आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची देखील हाकालपट्टी याच कारणामुळे करण्यात आल्यानंतर रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांनी भावनिक होऊन शिवसेनेसाठी एवढे वर्ष कार्य करून केलेली हकालपट्टी चुकीची असल्याचे माध्यमांच्या समोर सांगितले.
Ramdas Kadam : शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वेगळी समिती नेमावी - रामदास कदम - Ramdas Kadam criticized Uddhav Thackeray
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) वेगळी समिती नेमावी, अशी टीका रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांनी केली आहे. शिवसेनेकडून केलेला हकालपट्टीनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा रामदास कदम यांना शिवसेना नेते पदाची धुरा सोपवली आहे. त्यातच आज रामदास कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेण्यासाठी ( Ramdas Kadam Meet Eknath Shinde ) आलेले आहेत.

कदम यांच्याकडे शिवसेना नेते पदाची धुरा - शिवसेनेकडून केलेला हकालपट्टीनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा रामदास कदम यांना शिवसेना नेते पदाची धुरा सोपवली आहे. त्यातच आज रामदास कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेण्यासाठी ( Ramdas Kadam Meet Eknath Shinde ) आलेले आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे यावेळी रामदास कदम यांनी सांगितले. तर एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा ओघ मोठ्या प्रमाणात असून अनेक कार्यकर्ते शिंदे गटाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी वेगळी समिती नेमावी अशी खोचक टीका करत रामदास कदम यांनी सल्ला दिला. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे असे, देखील यावेळी रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात आले.