महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'..त्यामुळे सरकारने सध्या मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याचा धोका पत्करू नये' - रामदास आठवले ट्विट

औरंगाबादमध्ये ज्या मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबाला सरकारने 5 लाखांची दिली. ती मदत अल्प असून त्यांना सांत्वनपर 25 लाखांची मदत शासनाने द्यावी, अशी मागणी देखील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

Union Minister of State Ramdas Athawale
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By

Published : May 13, 2020, 1:33 PM IST

मुंबई - शहर आणि उपनगर परिसर रेड झोन मध्ये आहे. दररोज येथे नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीत मुंबईत रेल्वे लोकल सुरू केल्यास कोरोनाचा अधिक मोठया प्रमाणात भडका उडण्याचा धोका आहे. लोकल रेल्वे सुरू केल्यास त्यातील गर्दी रोखणे कठीण होईल. या गर्दीमुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठया प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे लोकल सध्या मुंबईत सुरू करू नये, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...विधान परिषद निवडणूक : भाजपने भाकरी फिरवली, रमेश कराडांनाच अधिकृत उमेदवारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तरीही केंद्र सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाने सध्या ही मागणी मंजूर करू नये. मुंबईत रेल्वे लोकल सध्या सुरू करणे धोकादायक असल्याने लोकल सुरू कारण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाने देऊ नये, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. मुंबईत रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याऐवजी व्यक्तिगत अंतर राखण्याचा नियम पाळत बेस्टची बस सेवा सुरू करावी, अशी सूचना आठवले यांनी केली आहे.

जिथे रेड झोन आहे, तिथे लॉकडाऊनचा कालावधी 30 मे पर्यंत वाढवावा, अशी आपली सूचना असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रस्त्याने उन्हातान्हात पायी चालत गावी जाणाऱ्या मजूरांना अडवून त्यांना जवळच्या रेल्वे स्थानकावर न्यावे आणि तेथून रेल्वेने त्यांना त्यांच्या गावी सोडवावे, अशी सूचना देखील त्यांनी राज्य सरकारला केली आहे. औरंगाबादमध्ये रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने 5 लाखांची केली आहे. ती मदत अल्प असून त्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत शासनाने करावी, अशीही मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details