मुंबईशिवसेनेमध्ये फूट पडली असून खरी शिवसेना कोणाची याचा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे पोहचला ( Ramdas Athawale on Shisvena Party symbol ) आहे. यादरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटालाच मिळणार असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मनसेला सोबत घेतल्यास त्यामुळे भाजपाला नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला Ramdas Athawale on shivsena alliance आहे.
धनुष्य बाण शिंदे गटालाच एका खासगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते. यावेळी बोलताना, शिवसेनेच्या धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, यावर आठवले यांनी ते चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच मिळणार, असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. शिवसेनेमध्ये पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह यावरून वाद सुरु आहे. फुटलेला शिंदे गट आपण शिवसेनाच असल्याचा दावा करत आहेत. पक्षाचे धनुष्य बाण हे चिन्ह आपल्याला मिळावे, यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. या दरम्यान आठवले यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे.