मुंबई -तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ गुजरातचा दौरा केला. तसेच राज्य सरकारने मदत मागायच्या आधीच हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यावरून उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांनी चिमटा काढला. वादळानंतर मोदींनी गुजरातचा दौरा केला, मात्र महाराष्ट्राचा दौरा का केला नाही, हे अद्यापही आम्हाला कळू शकले नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तसेच या कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. त्यामुळे रामदास आठवले आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनीच आता महाराष्ट्राल मदत करावी, असी खोचक विनंतीदेखील त्यांनी आठवले यांना केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टीज पुस्तकाचे प्रकाशन आणि राजणोली उड्डाणपुलाच्या ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे व दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचे लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
पेट्रोल दरवाढीवरून भाजपाला चिमटा -
राज्यात पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात 'तुतू-मैमै' सुरू आहे. राज्य सरकाने पेट्रोलवरील कर कमी करावे, असी मागणी विरोधांकडून होत आहे. यासंदर्भात उत्तर देताना केंद्र सरकारने त्यांचा कर कमी केला, तर नक्कीच सामान्य नागरिकांना पेट्रोल दरवाढी बद्दल दिलासा मिळेल,असे अजित पवार यांनी म्हटले.