मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने 14 एप्रिल हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस म्हणून संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. या निर्णयाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला संपूर्ण देशात साजरी होते. महाराष्ट्र्रासह काही राज्यांत 14 एप्रिलला ससर्वजनिक सुट्टी असते. मात्र, संपूर्ण देशात 14 एप्रिलचा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून अद्याप जाहीर झाला नव्हता. 14 एप्रिलचा दिवस केंद्र सरकारने सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आपण हार्दिक स्वागत करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या निर्णयाबद्दल अभिनंदन आणि आभार मानत असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.