महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राम कदम यांना उपोषणस्थळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात - Ram Kadam Latest News Mumbai

'तांडव' वेबसिरीजचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राम कदम यांनी घाटकोपर मधील चिरागनगर पोलीस स्टेशनसमोर एक दिवसीय उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनी राम कदम आणि त्यांच्या कर्यकर्त्यांना उपोषण स्थळावरून ताब्यात घेतले आहे.

राम कदम यांना उपोषणस्थळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात
राम कदम यांना उपोषणस्थळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात

By

Published : Jan 19, 2021, 4:53 PM IST

Updated : Jan 19, 2021, 5:43 PM IST

मुंबई-'तांडव' वेबसिरीजचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राम कदम यांनी घाटकोपर मधील चिरागनगर पोलीस स्टेशनसमोर एक दिवसीय उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनी राम कदम आणि त्यांच्या कर्यकर्त्यांना उपोषण स्थळावरून ताब्यात घेतले आहे.

राम कदम यांना उपोषणस्थळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात

'तांडव' वादाच्या भोवऱ्यात

अ‌ॅमेझॉन प्राईमवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'तांडव' वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे हिंदू देवदेवतांची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे 'तांडव' वेबसिरीजचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. राम कदम यांनी देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ते आपल्या मागणीसाठी चिरागनगर पोलीस स्टेशनसमोर आज उपोषणाला बसले होते. मात्र पोलिसांनी त्यांना उपोषणस्थळावरून ताब्यात घेतले आहे. दरम्यान तांडवविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Last Updated : Jan 19, 2021, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details