मुंबई – राम मंदिराचे येत्या पाच ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे. महाराष्ट्राचे सरकार व तीन पक्षांचे नेते हे धर्माचे राजकारण करत आहेत. त्यांनी हे राजकारण करू नये. सर्व धर्माँना समान सन्मान द्या, असा टोलावजा सल्ला भाजप नेते राम कदम यांनी महाविकाआघाडीला दिला आहे.
भाजप नेते राम कदम यांनी राम मंदिराच्या भूमिपुजनावरून महाविकाआघाडीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की राम मंदिराचे भूमिपूजन होणार असताना दररोज महाराष्ट्रातील नेते प्रतिक्रिया देतात. त्यावरून भाजप व महाविकास आघाडीत वाद-प्रतिवाद पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील नेते राम मंदिराच्या होणाऱ्या उद्घाटनावरही प्रतिक्रिया देत आहेत.
राम मंदिर भूमिपूजनावावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची कदम यांची टीका
राम मंदिर भूमिपूजनावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम जन्मभूमी उद्घाटनावर वक्तव्य केले. तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राम मंदिर अध्यक्ष यांना आमंत्रित करण्याची मागणी केली. तसेच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री अयोध्येला जाणार अशी घोषणा केली. त्यावर काँग्रेस नेते यांनी मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाऊ नये, अशी मागणी केली. याप्रकारे सरकारमध्ये ताळमेळ नसताना महाविकास आघाडीतील नेते राम मंदिरावर कडवट प्रतिक्रिया देत आहेत. त्यावर भाजप नेते राम कदम यांनी महाविकास आघाडीने धर्माचे राजकारण करू नये असे म्हटले आहे.