मुंबई : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारनं ५ वर्षासाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने व गृह खात्याने मागील अनेक वर्षापासून याबाबत योग्य तो आढावा घेऊन पीएफआय संघटनेची (PFI organization) पूर्णपणे माहिती घेतली. या संघटना देशद्रोही व आतंकवादी कारवांयामध्ये लुप्त असल्याचं समोर आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली (PFI organization banned for 5 years) आहे. या बंदीनंतर भाजप नेते राम कदमयांनी प्रतिक्रिया देत ही बंदी योग्य असल्याचे म्हटले आहे. मुंबईत ते बोलत होते.
Ram Kadam PFI Ban : देशद्रोह्यांना 'या' भूमीत एक इंचही जागा मिळणार नाही - राम कदम
केंद्र सरकारने व गृह खात्याने मागील अनेक वर्षापासून याबाबत योग्य तो आढावा घेऊन पीएफआय संघटनेची (PFI organization) पूर्णपणे माहिती घेतली. या संघटना देशद्रोही व आतंकवादी कारवांयामध्ये लुप्त असल्याचं समोर आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली (PFI organization banned for 5 years) आहे.
काय म्हणाले राम कदम ?याबाबत बोलताना राम कदम म्हणाले (Ram Kadam said) की, मग कोणतीही संघटना या देशात राहून या देशाचं खायचं, प्यायचं व गुणगान मात्र आपला जो शत्रू देश आहे, त्या शत्रूचं करायचं. या देशाच्या भूमीवर पाकिस्तान जिंदाबादचे नारे द्यायचे. जो या देशाचा सच्चा भक्त आहे, तो हे कसा काय सहन करेल? आणि त्याच्या पलीकडे जाऊन इथला जो युवक आहे त्याने अतिरेकी करावांयामध्ये भाग घ्यावा म्हणून त्याची माथी भडकावून त्यांना प्रेरित करायचं, हा बदललेला भारत आहे. याबदललेल्या भारतात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशद्रोही, देशविरोधी कारवाई करणाऱ्या विरोधात कारवाई तर होणारच.
सहन करायला, आता काँग्रेसचे राज्य नाही -राम कदम पुढे म्हणाले की, या भारतात राहून शत्रू राष्ट्र पाकिस्तानचे गुणगान गायला व ते सहन करायला आता काही काँग्रेसचे सरकार राहिलं नाही. त्यांनी ते सहन केलं असतं. हे मोदीजींचं सरकार आहे आणि जी ह्या संघटनेवर बंदी घातली ती बंदी याबाबत धोत्रक आहे की आतंकवाद, अतिरेकी कारवाया यामध्ये सामील व त्यांना समर्थन देणारे लोक यांना या भारताच्या भूमीत इंचभर ही जागा भेटणार (Traitors will not find inch of space in this land) नाही. हा संदेश या निमित्ताने आपण पूर्ण विश्वाला दिला आहे. असेही राम कदम म्हणाले.