मुंबई -आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( Maharashtra Government Cabinate Meeting ) ठाकरे सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत निर्बंधाच्या ( Covid Restriction In Maharashtra ) बंधनात अडकलेल्या महाराष्ट्रातील तसेच मुंबईतील तमाम जनतेला निर्बंधातून मुक्त ( Covid Restrictions Revoked In Maharashtra ) करण्यात आले आहे. याविषयी बोलताना राम कदम यांनी ( Ram Kadam ) हा जनतेचा विजय असल्याचे सांगितले आहे.
'सकाळी खरमरीत पत्र आता गोड बातमी' -येणाऱ्या गुढीपाडवा व त्याचबरोबर राम नववी या सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध उठवले जातील का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भामध्ये भाजप नेते, आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र आजच लिहिलं होतं. त्यामध्ये स्पष्टपणे तुमचे निर्बंध गेले चुलीत, येणारे सर्व सण आम्ही थाटात व जल्लोषात साजरे करू असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज सरकारने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना हा सर्वस्वी जनतेचा विजय असल्याचं राम कदम यांनी सांगितल आहे.
काय म्हणाले राम कदम? -४८ तासापूर्वी हे सरकार सांगते निर्बंध लावले जातील. आता सांगते नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा, रामनवमी आहे. बाबासाहेबांची मिरवणूक १४ एप्रिलला काढली जाणार. अगोदर या सगळ्यांवर निर्बंध राहणार हे नाही करायचं, ते नाही करायचं, हे केलं तर तुरुंगात टाकू. म्हणून आज मी या सरकारला सांगितलं, हिम्मत असेल तर हे निर्बंध लावून तर पहा. तुमच्या निर्बंधांचे आदेश आम्ही मातीच्या चुलीत टाकून जाळून टाकू. शेवटी जनतेच्या प्रक्षोभा पुढे या सरकारला झुकावे लागले. बरोबर ४८ तास भरण्यापूर्वी या सरकारने जाहीर केलं की निर्बंध मागे घेत आहोत. अखेर जनतेसमोर झुकावेच लागले. तुम्ही आज निर्बंध मागे घेतले. ४८ तासांपूर्वी जाहीर केलं होतं निर्बंध लागणार म्हणून. स्वतः घरात बसून महाराष्ट्राच्या जनतेने घरात काय करायचं, काय खायचं, हे करू नका, असे करू नका, असे फुकटचे सल्ले आम्हाला नको. आम्हाला आमच्या तब्येतीच्या कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित माहिती आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रक्षोभापुढे आज सरकारला निर्बंध मागे घ्यावे लागले.अखेर सरकारला जनतेसमोर झुकावे लागले, असे राम कदम यांनी म्हटले होते.
हेही वाचा -Covid Restrictions Revoked Maharashtra : मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..