महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवजयंतीवर निर्बंध; शिवसेनेचे आणखी एक लोटांगण भाजपा मुख्य प्रवक्ते राम कदम यांची टीका

शिवजयंती साजरी करण्यासाठी बंधने घालन्यात आली आहेत. यावर सत्तेसाठी शिवसेनेचे आणखी एक लोटांगण अशी टीका भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे.

ram-kadam-criticizes-shiv-sena
शिवजयंतीवर निर्बंध; शिवसेनेचे आणखी एक लोटांगण भाजपा मुख्य प्रवक्ते राम कदम यांची टीका

By

Published : Feb 12, 2021, 6:48 PM IST

मुंबई -सत्तेसाठी शिवसेनेने अनेकदा काँग्रेस - राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने 'घालीन लोटांगण, वंदीन चरण' चा नवा प्रयोग सादर केला आहे, अशी टीका भाजपा नेते राम कदम यानी केली आहे.

शिवजयंतीवर निर्बंध; शिवसेनेचे आणखी एक लोटांगण भाजपा मुख्य प्रवक्ते राम कदम यांची टीका

प्रसिद्धीपत्रकात राम कदम यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास निर्बंध घालणाऱ्या महाआघाडी सरकारने आपला खरा 'रंग' दाखवला आहे. हिंदू समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीला अटक करण्यास महाआघाडी सरकारटाळाटाळ करते. सत्ता टिकविण्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेने 'घालीन लोटांगण' चा आणखी एक प्रयोग महाराष्ट्रात सादर केला आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकार कडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर आघाडी सरकारनेअनेक निर्बंध घातले आहेत. दारूची दुकाने, नाईटलाइफ,बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकार गर्दी चा विचार करीत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात कोरोनाच्या नावाखाली अनेक अडचणी आणल्या जात आहेत. धार्मिक भावना भडकवणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देताना आघाडी सरकार मागेपुढे पहात नाही. मात्र शिवजयंती राज्यकर्त्यांच्या डोळ्यात का खुपते? असा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details