मुंबईत युतीच्या मेळाव्यास सुरुवात - मेळावा
युतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई - युतीचा मेळावा
मुंबई - भाजप -शिवसेना-आरपीआय (ए) रासप पक्षांचा आज उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रातील युतीच्या मेळाव्यास सुरुवात झाली आहे. युतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात युतीचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार उपस्थित आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल कार्यकर्त्यांना प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.