महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PMC Bank Scam Case : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात राकेश वाधवानची केईएम रुग्णालयात रवानगी करण्याचे आदेश - अंबानी रुग्णालय मुंबई

मुंबईतील पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील ( PMC Bank Scam Case ) आरोपी राकेश वाधवानची ( HDIL Promoter Rakesh Wadhawan ) रवानगी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातून ( Kokilaben Ambani Hospital ) केईएम रुग्णालयात ( KEM Hospital Mumbai ) करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) दिले आहेत. पुढील उपचार हे केईएम रुग्णालयात होणार आहेत.

राकेश वाधवान
राकेश वाधवान

By

Published : Mar 31, 2022, 10:09 PM IST

मुंबई- पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ( PMC Bank Scam Case ) अटक करण्यात आलेल्या एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवानची ( HDIL Promoter Rakesh Wadhawan ) रवानगी उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) केईएम रुग्णालयात केली आहे. न्यायालयाने वाधवानला कोकिळाबेन अंबानी ( Kokilaben Ambani Hospital ) या खासगी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी सहा आठड्याची परवानगी दिली होती. खंडपीठाने पुढील वैद्यकीय उपचारासाठी केईएम रूग्णालयात ( KEM Hospital Mumbai ) दाखल करण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयात याचिका : पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ४३५५ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान यांच्यासह दलजीत सिंग पाल, गुरुंनाम सिंग होठी आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. राकेश वाधवानला अटक करण्यात आली असून तब्बेत खालावल्याने केईएम रुणलयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यात यावा अथवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात यावे अशी मागणी करत वाधवानने उच्च न्यायालयात याचिका केली होती.


मुदत संपल्याने निर्णय : याचिकेची दखल घेत न्यायालयाने वाधवानवर खाजगी कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यास सशर्त परवानगी दिली होती. शस्त्रक्रियेसोबतच सहा आठवडे वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रूगणालयात राहण्याची परवानगी दिली होती. ही मुदत संपल्याने न्या. अनुजा प्रभूदेसाई यांनी पुढील उपचारासाठी वाधवानला केईएम रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details