मुंबईभारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार होते मात्र त्यांचे नातेवाईक न पोहचल्याने रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार Rakesh Jhunjhunwala funeral will be delayed आहेत
अशी करण्यात आलीय तयारी भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला वयाच्या ६२ व्या वर्षी आज काळाच्या पडद्याआड गेले मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर बाणगंगा येथील स्मशान भूमीत आज संध्याकाळी ५.३० वाजता अंतिम संस्कार केले जाणार होते त्याआधी त्यांचे पार्थिव मलबार हिल येथील राहत्या घरी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी लोकांची गर्दी वाढू लागली आहे दरम्यान ते राहत असलेल्या इमारतीच्या खाली काही वेळ त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे त्यानंतर Mh-47-A-2197 या A/C अंबुलन्स मधून त्यांचे शव बाणगंगा स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यासाठी नेण्यात येणार आहे
अंतिम संस्काराला होणार उशीर झुनझुनवाला यांच्यावर सायंकाळी अंतिम संस्कार होतील असे सांगण्यात आले होते त्यासाठी त्याआधी अनेकांनी झुनझुनवाला यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले मात्र त्यांचे नातेवाईक आले नसल्याने रात्री उशिरा अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली