मुंबई - देशातील आणि जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले अवघे पाच हजार रुपये घेऊन शेअर बाजारात उतरले आणि उभी केली जीवनाची यशोगाथा अडचणीवर मात करत केलेल्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा थक्क करणारा प्रवास आपण जाणून घेणार आहेत
अशी मिळाली आयुष्याला कलाटणी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेक जण राकेश झुनझुनवाला यांचा जीवनपट पाहून गुंतवणूक करतात झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला. वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि ते शेअर बाजारात गुंतवणूक करायचे येथूनच राकेश झुनझुनवाला यांच्या प्रवासाची सुरुवात झाली वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून चार्टंड अकाऊंटंटचा कोर्स केला त्यानंतर त्यांनी शेअर बाजारात पाय रोवण्याचा निर्णय घेतला मात्र वडिलांनी पैसे देण्यास थेट नकार दर्शवला आधी स्वत: पैसे कमव आणि मग शेअर बाजारात प्रवेश कर अशा शब्दांत राकेश झुनझुनवाला यांना कानपिचक्या दिल्या वडिलांना मोठे होऊन दाखवेन असे ध्येय बाळगून त्यांनी शेअर बाजारात प्रथमच पाच हजार रुपये गुंतवले १९८६ चा टाटा टीचे शेअर्स ४३ रुपयांना विकत घेतले त्या काळी पाच हजारात त्यांनी १४३ रुपये प्रति शेअर्स नफा मिळवला १९८६ ते १९८७ वर्षात सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा त्यांना नफा झाला सेसा स्टारलिट कंपनीचे चार लाख शेअर एक कोटी रुपयांना विकत घेतले या गुंतवणुकीत भरघोस नफा कमावला हेच यश त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले
सक्रीय गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक व्यावसायिक होते झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते प्राइम फोकस लिमिटेड जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस बिलकेअर लिमिटेड प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड प्रोव्होग इंडिया लिमिटेड कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये ५.५ टक्के भागीदारी होती झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये २६ जुलै २०२२ मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे १० हजार ३०० कोटींच्या आसपास होते स्टार हेल्थमध्ये त्यांची १४.३९ टक्के भागिदारी होती