महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajyasabha Election 2022 : राज्यसभेसाठी आज होणार मतदान; सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढाई - राज्यसभा निवडणूक महाविकास आघाडी

विधानसभेतून राज्यसभेवर ( Rajyasabha Election 2022 ) जाणाऱ्या सहा जागांसाठी आज ( 10 जून ) मतदान होत आहे. एकूण सात उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून, त्यापैकी सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

Rajyasabha Election 2022
Rajyasabha Election 2022

By

Published : Jun 10, 2022, 6:02 AM IST

मुंबई -विधानसभेतून राज्यसभेवर ( Rajyasabha Election 2022 ) जाणाऱ्या सहा जागांसाठी आज ( 10 जून ) मतदान होत आहे. एकूण सात उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून, त्यापैकी सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी विरोधात भाजपाने जोर लावला आहे. मात्र, अपक्ष, इतर छोटे पक्षांच्या आमदारांची मते निर्णायक ठरणार असल्याने ते कोणाला मतदान करणार हे या निवडणूक प्रक्रियेनंतर समोर येणार आहे.

राज्यसभेची निवडणूक आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक, तर भाजपाने तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण सहा जागांसाठी निवडणूक होणार असली तरी एकूण सात उमेदवार लढवणार अहेत. एकूण पाच जागा सहज निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. इतर छोटे पक्ष, अपक्ष आमदारांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.

विधानभवनाबाहेरुन आढावा घेताना प्रतिनिधी

शिवसेनेकडे ५६ मते आहेत. या एकूण मतांमधून संजय राऊत हे पहिल्या पसंतीचे उमेदवार निवडून जातील. तर, दुसऱ्या पसंतीची मते संजय पवार यांच्या पारड्यात पडणार आहेत. शिवसेनेकडे केवळ स्वतःची १४ मते शिल्लक राहतील. उर्वरित २८ मतांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, इतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे.

शिवसेना संख्याबळ जुळवणार? -शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ४२ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे १४ मते शिल्लक राहतील, तर राष्ट्रवादीकडून बारा ऐवजी दहा मते मिळणार आहेत. काँग्रेसचे दोन आणि इतर छोटे पक्ष, अपक्ष यांची १६ असे संख्याबळ गाठावे लागेल. अशातच एकदा मत बाद झाल्यास डोकेदुखी वाढणार आहे. त्यात न्यायालयाने माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचा निर्णय प्रलंबित ठेवल्याने महाविकास आघाडीच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे अपेक्षित संख्याबळ शिवसेना कसे गाठणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेचे महाराष्ट्रातील 288 मतांचे गणित

भाजपाची जोरदार तयारी - विधानसभेत जागा घटल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी चिन्ह होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांच्या रूपाने तिसरा उमेदवार देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. भाजपा आणि मित्रपक्ष मिळून ११३ इतके संख्याबळ आहे. विजयी संख्याबळ गाठण्यासाठी १३ मते घ्यावी लागतील. ही मते मिळवण्यासाठी भाजपा नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेल्या आमदारांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र निवडणुकीनंतर भाजप मताधिक्य गाठेल का?, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला -महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक तारखा दिल्या. मात्र, सरकार स्थापन होऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी राज्यसभेची निवडणूक भाजपला महत्वाची असल्याने जोर लावला आहे. इतर छोटे पक्ष, अपक्ष आमदारांनी एकगठ्ठा मतदान भाजपच्या बाजूने केल्यास आघाडी सरकार अस्थिर होईल. त्यामुळेच आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली असून, छोट्या पक्षांना सामावून घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे.

पक्षीय बलाबल -

शिवसेना - ५५
राष्ट्रवादी - ५४
कॉंग्रेस - ४४
इतर पक्ष - ८
अपक्ष - ८


एकूण - १६९

भाजप - १०५
रासप - १
जनसुराज्य - १
अपक्ष - ५

एकूण - ११३

हेही वाचा -नगरपरिषदा, नगरपंचायत सदस्यपदाच्या आरक्षणाची 13 जून रोजी सोडत

ABOUT THE AUTHOR

...view details