मुंबई - दहा जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार ( Rajyasabha Election 2022 Six Seat In Maharashtra ) आहे. सहा जागांपैकी पाच जागांवर भाजपचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक, असे उमेदवार जवळपास अशक्य आहे. मात्र, सहाव्या जागेसाठीची चुरस निवडणुकीतून पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपचे पियुष गोयल ( Bjp Piyush Goyal ) , विनय सहस्त्रबुद्धे ( Vinay Sahasrabuddhe ) आणि विकास महात्मे ( Vikas Mahatme ), शिवसेनेचे संजय राऊत ( Sanjay Raut ), काँग्रेसचे पी. चिदंबरम ( P Chidambaram ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल ( Prafull Patel ) यांचा कार्यकाळ चार जुलैला संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. 10 जून 2022 ला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेचे एकूण 57 खासदारांचा कार्यकाळ 4 जुलैला संपत आहे. देशभरातून राज्यसभेवर जाणाऱ्या सत्तावन्न जागांसाठी या दिवशी निवडणूक होईल. महाराष्ट्रातून जाणाऱ्या 19 खासदारांपैकी सहा खासदार नव्याने राज्यसभेवर जातील. त्यामुळे प्रत्येक पक्षाची मोर्चेबांधणी आता सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 24 मे ला अधिसूचना जारी होणार आहेत. तर 31 मे ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. तसेच, 3 जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत .
सहाव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता? -विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारावर राज्यसभेवर प्रत्येक पक्षाचे खासदार पाठवले जात असतात. महाराष्ट्रातील चार मोठ्या पक्षाच्या संख्यांची सरासरी पाहिली तर, भाजप 2 शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, आणि काँग्रेसकडून 1 असे एकूण पाच खासदार सहज जाऊ शकता. मात्र, सहाव्या राज्यसभा सदस्याच्या निवडीसाठी चुरस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यसभेवरील एक जागा निवडून आणण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 42 मतांचा कोटा असतो.
चार पक्षातील विधानसभा सदस्य -
भाजप - 106 आमदार
शिवसेना- 57 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस - 54 आमदार
काँग्रेस - 44 आमदार
यानुसार भाजपला आपले दोन खासदार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. मात्र, त्यानंतर केवळ 22 मते भाजपकडे शिल्लक राहतील. तर, महाविकास आघाडीकडे जवळपास 29 मते शिल्लक राहतील. यासोबतच काही लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची जुळवाजुळव सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीला करावी लागणार आहे. त्यातच नुकतेच संभाजीराजे छत्रपती यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपण राज्यसभेवर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सामंजस्य होऊन संभाजीराजे छत्रपती यांना सहाव्या जागेसाठी पाठवलं जाईल का? किंवा महाविकास आघाडी आणि भाजप इतर पर्यायांचा विचार करेल हे लवकर स्पष्ट होईल.
कोणत्या पक्षाकडून कोणते उमेदवार -
पियुष गोयल - पियुष गोयल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच जागेवर इतर नावाचा विचार केला जाणार नाही. त्यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवले जाणारा असल्याची शक्यता आहे.
विनय सहस्त्रबुद्धे -विनय सहस्त्रबुद्धे यांची पक्षामध्ये प्रगल्भ वैचारिक नेते म्हणून ओळख आहे. मात्र, त्यांना भाजपकडून पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता कमी असून, या जागेवर इतर नावाचा शोध भाजपकडून सुरु आहे.
विकास महात्मे - भाजपकडून पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता कमी असून, याही जागेवर इतर नावाचा शोध भाजपकडून सुरु आहे.
संजय राऊत -संजय राऊत आतापर्यंत तीन वेळा राज्यसभेवर शिवसेनेकडून गेले आहेत. चौथ्यांदा देखील त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
प्रफुल पटेल - प्रफुल पटेल यांची देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
पी. चिदंबरम - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना देखील महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर धाडले. आता पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाळ संपत असताना याबाबत अद्याप तरी काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
राष्ट्रपती निवडणुकीमुळे विशेष महत्त्व -निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५७ जागेसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक अन्य पक्षासह भाजपसाठीही तितकीच महत्वाची आहे. याचे कारण, भाजपने २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविले. पण, राज्यसभेत अल्पमतात असल्याने भाजपला खास करून मोदी ०.१ मध्ये अनेक विधेयक मंजूर करून घेता आली नव्हती. २०१४ मध्ये भाजपचे राज्यसभेत केवळ ५५ खासदार होते. दरम्यानच्या काळात भाजपने ईशान्येकडील राज्ये आणि अन्य भाजपशासित राज्याच्या बळावर राज्यसभेतील संख्याबळ ५५ वरून १०० वर नेले. आता ५७ जागेसाठी मतदान होत आहे. यातील जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपला राज्यसभेतही बहुमत प्राप्त करायचे आहे. येणाऱ्या काळात समान नागरी कायदा आणायचा आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर होण्यात अडचण येणार नाही. मात्र, बहुमत नसेल तर राज्यसभेत अडचण येऊ शकेल. म्हणूनच भाजपसाठी राज्यसभेची निवडणूक महत्वाची आहे.
Rajyasabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक; भाजप आणि मविआसाठी किती महत्त्वाची? - राज्यसभा निवडणूक प्रफुल पटेल
दहा जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक ( Rajyasabha Election 2022 Six Seat In Maharashtra ) होणार आहे. सहा जागांपैकी पाच जागांवर भाजपचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक, असे उमेदवार जवळपास अशक्य आहे.
या निवडणूक निकालावर दोन महिन्यांत होणाऱ्या राष्ट्रपती निवडीचा निकाल अवलंबून असेल, असे मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, केंद्रात असलेल्या विरोधी पक्षाला राज्यसभेच्या निवडणुकीत झटका द्यायचा आहे. जेणेकरून पुढे होणार्या राष्ट्रपती निवडणुकीत त्याचा फायदा विरोधकांना घेता येईल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता भाजप उजवा ठरेल, असे वाटत असल्यासही विवेक भावसार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -Mns Vs Shivsena : 'अटी शर्ती फक्त राज ठाकरेंसाठीच का?', मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन मनसेचा सवाल