मुंबई - राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत चुरस लागलेली असताना सहावा उमेदवार कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले ( Rajya Sabha Election Voting ) आहे. काँग्रेसचे आमदार मतदानासाठी दाखल झाले ( Congress MLAs In Vidhan Bhavan ) आहेत. याविषयी बोलताना काँग्रेसचे नेते, मंत्री बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Thorat ) यांनी सांगितलं आहे की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून ( MVA Candidate Will Won RS Election ) येतील.
नाराजी नाही :दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या मतांचा कोटा वाढला असल्याकारणाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. या विषयावर बोलताना शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले की, अशा पद्धतीची कुठलीही नाराजगी नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते नवाब मलिक व अनिल देशमुख ही कमी होण्याची शक्यता असल्याकारणाने त्यांनी त्यांचा कोटा वाढवलेला आहे.
अपक्षांची मते निर्णायक :विधानसभेतून राज्यसभेवर ( Rajyasabha Election 2022 ) जाणाऱ्या सहा जागांसाठी आज ( 10 जून ) मतदान होत आहे. एकूण सात उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून, त्यापैकी सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी विरोधात भाजपाने जोर लावला आहे. मात्र, अपक्ष, इतर छोटे पक्षांच्या आमदारांची मते निर्णायक ठरणार असल्याने ते कोणाला मतदान करणार हे या निवडणूक प्रक्रियेनंतर समोर येणार आहे.