महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

RS Election 2022 : महाविकास आघाडीला 'बूस्टर डोस'.. एमआयएमचा पाठिंबा.. भाजपचा 'खेळ' बिघडणार - MIM BVA Decided To Vote MVA

राज्यसभा निवडणुकीत ( Rajyasabha Election 2022 ) सहाव्या जागेसाठी चुरस वाढलेली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे. एमआयएमचे दोन आमदार महाविकास आघाडीच्या पारड्यात त्यांची मतं टाकणार ( MIM Decided To Vote MVA ) असल्याने भाजपच्या अडचणी मात्र वाढल्या ( RS Election BJP Is In Trouble ) आहेत.

Rajya Sabha Election 2022 MIM Decided To Vote MVA
महाविकास आघाडीला 'बूस्टर डोस'.. एमआयएमचा पाठिंबा.. भाजपचा 'खेळ' बिघडणार

By

Published : Jun 10, 2022, 11:49 AM IST

Updated : Jun 10, 2022, 12:04 PM IST

मुंबई :राज्यसभा निवडणुकीसाठी ( Rajyasabha Election 2022 ) आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली असताना एमआयएमचे दोन आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट झाले ( MIM Decided To Vote MVA ) आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली ( RS Election BJP Is In Trouble ) आहे.

शिवसेनेकडे ५६ मते आहेत. या एकूण मतांमधून संजय राऊत हे पहिल्या पसंतीचे उमेदवार निवडून जातील. तर, दुसऱ्या पसंतीची मते संजय पवार यांच्या पारड्यात पडणार आहेत. शिवसेनेकडे केवळ स्वतःची १४ मते शिल्लक राहतील. उर्वरित २८ मतांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, इतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे.

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ४२ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे १४ मते शिल्लक राहतील, तर राष्ट्रवादीकडून बारा ऐवजी दहा मते मिळणार आहेत. काँग्रेसचे दोन आणि इतर छोटे पक्ष, अपक्ष यांची १६ असे संख्याबळ गाठावे लागेल. अशातच एकदा मत बाद झाल्यास डोकेदुखी वाढणार आहे. त्यात न्यायालयाने माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचा निर्णय प्रलंबित ठेवल्याने महाविकास आघाडीच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे अपेक्षित संख्याबळ शिवसेना कसे गाठणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यातील पहिल्या पसंतीचे मत हे काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढींना एमआयएम देणार आहे. तर दुसऱ्या पसंतीचे मत हे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना मिळण्याची शक्यता आहे. एमआयएमचे दोन आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ट्विटद्वारे दिली आहे. महाविकास आघाडीने जाहीर पाठिंबा मागितला तर देऊ अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केली होती. त्यानंतर गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याच खा इम्तियाज जलील यांनी सांगितलं.


अटी शर्टींवर पाठिंबा :महाविकास आघाडीला पाठिंबा देत असताना आम्ही काही मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये आमचे दोन आमदार असलेले धुळे आणि मालेगाव या मतदार संघांमध्ये विकास कामे करा, एमपीएससी मंडळावर अल्पसंख्यकांचा सदस्य नेमा, रखडलेले मुस्लिम आरक्षण मार्गी लावा अशा मागण्या केल्या असून, मत वाया जाण्यापेक्षा लाखो लोकांचा फायदा होणार असेल तर का मतदान करू नये, असा विचार करून मतदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जलील यांनी दिली.


शिवसेना कायम विरोधक राहणार :शिवसेनेचे विचार आणि आमचे विचार कायम वेगळे आहेत. आमच्यात राजकीय मतभेद कायम राहणार आहेत. शिवसेनेसोबत काँग्रेस राष्ट्रवादी देखील महाविकास आघाडीत आहेत. त्यात भाजपला हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला मतदान देणार आहे. याचा अर्थ हा नाही की आम्ही आता सेनेसोबत राहू, महानगरपालिका निवडणुकीत विरोधात लढणार आहोत, असं स्पष्टीकरण जलील यांनी दिले.

हेही वाचा : Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक मतदानाला सुरुवात.. बाळासाहेब थोरात म्हणाले, 'विजय आमचाच'

Last Updated : Jun 10, 2022, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details