महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत नाराजी, मात्र पुनर्विकासाला विरोध नाही- राजू वाघमारे - mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची मुहूर्तमेढ साधली जाणार आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा शुभारंभ उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र काँग्रेस प्रवक्ते आणि अखिल बीडीडी चाळ सर्व संघटना एकत्रित संघ अध्यक्ष राजू वाघमारे यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत नाराजगी व्यक्त केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे
काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे

By

Published : Jul 31, 2021, 6:42 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची मुहूर्तमेढ साधली जाणार आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा शुभारंभ उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र काँग्रेस प्रवक्ते आणि अखिल बीडीडी चाळ सर्व संघटना एकत्रित संघ अध्यक्ष राजू वाघमारे यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत नाराजगी व्यक्त केली आहे. अद्यापही शासनाने रहिवाशांच्या मुख्य मागण्या पूर्ण केल्या नसल्यामुळे राजू वाघमारे यांनीही नाराजगी व्यक्त केली आहे. मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत नाराजी, मात्र पुनर्विकासाला विरोध नाही- राजू वाघमारे

कार्यक्रमाला आमंत्रण नसल्याने खंत -
बीडीडी चाळींचा पुनर्विकासआधी रहिवाशांच्या तीन मुख्य मागण्या आहेत. त्या मागण्या गृहनिर्माण मंत्री यांनी पूर्ण कराव्यात अशी मागणी पत्रकार परिषदेतून राजू वाघमारे यांनी केली आहे. वर्षानुवर्षे आपण बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या न्यायासाठी लढलो. मात्र पुनर्विकासाच्या भूमिपूजनासाठी साधं आमंत्रणही देण्यात आले नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात असताना बीडीडी चाळीच्या कार्यक्रमांमध्ये किमान आपल्याला आमंत्रण तरी देण्यात येत होते, असा टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

राज्यसरकारने तीन मुख्य मागण्या पूर्ण कराव्यात -
बिजली चाळीच्या रहिवाशांना कायमचा रहिवासी करार मिळाला पाहिजे, ही प्रमुख मागणी राजू वाघमारे यांनी केली आहे. पुनर्विकास आधी झोपडीधारक किंवा घर मालकांना हा करार देणे बंधनकारक असूनही अद्याप असा करार म्हाडातर्फे करण्यात आला नसल्यास राजू वाघमारे यांनी सांगितले. तसेच अतिक्रमण आणि निष्कासन विभाग या खात्याच्या अंतर्गत बीडीडी चाळीचा सर्वे करण्यात आला असून या सर्वेमध्ये तीस टक्के रहिवाशांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्वे रद्द करून पीडब्ल्यूडी खात्याअंतर्गत नवीन सर्वे करण्यात यावा, अशी दुसरी मागणी करण्यात आली आहे. तसेच पुनर्विकास करण्यासाठी सरकार 1996 च्या आधीचे पुरावे रहिवाशांकडून मागत आहे. पण राज्य सरकारच्या नियमानुसार 1995 च्या नंतरच्या झोपड्यांना सरकार मान्यता देत असेल तर 1996 चे पुरावे का मागितले जात आहेत? असा सवाल राजू वाघमारे यांनी उपस्थित केला. तसेच म्हाडा अंतर्गत पुनर्वसन करून रहिवाशांना पाचशे स्क्वेअर फुटची घरे दिली जाणार मात्र पुनर्विकास करून 700 स्केअर फुटची घरे देण्यात यावी, अशी मागणी राजू वाघमारे यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

राज्य सरकारने तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात -

या सर्व मागण्या राज्य सरकारने तात्काळ पूर्ण कराव्यात. उद्या होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला रहिवाशांचा कुठलाही विरोध नाही. त्यामुळे या विरोधात कोणतेही निदर्शने केली जाणार नाही. मात्र राज्य सरकारने रहिवाशांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर, येणाऱ्या काळामध्ये सरकारविरोधात निदर्शने केली जातील असा इशारा राजू वाघमारे यांनी दिला आहे.

हेही वाचा -BULLET TRAIN गुजरातमधील वापीजवळ कॉरिडॉरवर उभारला सुमारे 12 मीटर उंचीचा खांब!

ABOUT THE AUTHOR

...view details