मुंबई -18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक ( Presidential Election 2022 ) होणार आहे. त्यासाठी विरोधकांची नुकतीच एक बैठक 15 जुलैला दिल्लीत पार पडली. मात्र, भाजपकडूनही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्यावरून देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंह ( Rajnath Sing ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याशी गुरुवारी संध्याकाळी फोन वरून सवांद साधला. या सवांदात एनडीएच्या राष्ट्पती उमेदवारांबाबत चर्चा झाली पासून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेने समर्थन द्यावे अशी मागणी केली असल्याची माहिती आहे.
18 जुलैला होणार्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाची चर्चा करण्यासाठी भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. यानंतर राजनाथ सिंह यांनी शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्या सोबत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.