महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजीव गांधी जयंती : राज्यात सामाजिक ऐक्य पंधरवाडा

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती २० ऑगस्टला आहे. राज्यात हा सद्भावना दिवस म्हणू साजरा करण्यात येणार आहे. तसेच, सामाजिक ऐक्य पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. याची माहिती मंत्र नवाब मलिक यांनी दिली आहे.

rajiv gandhi
rajiv gandhi

By

Published : Aug 12, 2021, 9:32 PM IST

Updated : Aug 12, 2021, 9:44 PM IST

मुंबई - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती २० ऑगस्टला आहे. राज्यात हा सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ याकाळात सामाजिक ऐक्य पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृध्दींगत करणे व हिंसाचार टाळणे हे या पंधरावड्याचे प्रमुख उद्दिष्टे असेल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

सामाजिक ऐक्य पंधरवाडा

कोरोना नियमांचे पालन करुन सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. राज्यातील तसेच देशातील सामाजिक ऐक्य, सौहार्द, सद्भावना वाढीस लागण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मलिक यांनी केले. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या निर्देशास अनुसरुन सामाजिक ऐक्य पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील परिपत्रकाद्वारे विविध सूचना दिल्याचे मलिक यांनी सांगितले.

कोरोना त्रिसुत्रीचे पालन महत्वाचे

'मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतर विषयक नियमांचे पालन करून सद्भावना दिवस साजरा करण्यात यावा. सर्व उपस्थितांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात यावे. महसूल विभागाच्या आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन, लाऊड स्पिकरमार्फत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा प्रांगणात सामाजिक अंतर या नियमांचे पालन करून सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घ्यावी. यावर्षी सद्भावना शर्यत आयोजित करू नये. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषतः युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सद्भावना या विषयावर वेबिनार इत्यादीव्दारे संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत', अशा सूचना देण्यात आल्याचे मलिक म्हणाले.

भाषण देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना निमंत्रण

'सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी वेबिनारद्वारे संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रख्यात स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. सांस्कृतिक कार्य संचालक यांनी पंधरवड्यामध्ये वेबिनारद्वारे संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत', असे नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा -मोदी सरकारच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद, नाना पटोलेंचा आरोप

Last Updated : Aug 12, 2021, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details