महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivaram Rajguru इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून राजगुरूंनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा घेतला बदला - शिवराम हरी राजगुरू

यावर्षी शिवराम हरी राजगुरू यांची 114 वी जयंती साजरी करत Shivaram Rajguru Birth Anniversary आहोत. यानिमित्त आपण राजगुरु यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सायमन कमिशनला विरोध Simon Commission करताना लाला लजपत राय Lala Lajpat Rai यांना ब्रिटीशांच्या लाठीचाराला सामोरे जावे लागले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या. त्यानंतर 23 मार्च 1931 रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

Shivaram Rajguru
शिवराम हरी राजगुरू

By

Published : Aug 20, 2022, 11:12 AM IST

Updated : Aug 20, 2022, 11:35 AM IST

मुंबई क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु हे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या indias freedom fight ज्वालेतील तीन धगधगते निखारे होते. देशभक्तीच्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरात लिहिल्या जात असताना या तीन रत्नांतील एक तेजस्वी रत्न म्हणजे मराठी मातीतील शिवराम हरी राजगुरु आहेत. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांची नावे आपण क्रांतिकारक म्हणून घेतो. त्यातील राजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील आहे हे अनेकांना माहित नसेल. शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी झाला होता. 23 मार्च 1931 रोजी त्यांना त्यांचे सहकारी भगतसिंग आणि सुखदेव थापर यांच्यासह ब्रिटीश सरकारने फाशी दिली. यावर्षी शिवराम हरी राजगुरू यांची 114 वी जयंती साजरी करत Shivaram Rajguru Birth Anniversary आहोत.

राजगुरू यांचा इतिहास राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी खेड येथे पार्वतीदेवी आणि हरिनारायण राजगुरू यांच्या पोटी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. खेड हे पुण्याजवळ भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. ते अवघे सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबाची जबाबदारी त्यांचा मोठा भाऊ दिनकर यांच्यावर आली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड येथे झाले आणि नंतर ते पुण्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकले. तरुण वयात ते सेवादलात दाखल झाले. डॉ. एन.एस. हर्डीकर यांनी घटप्रभा येथे घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात ते सहभागी झाले होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते. भारत हा ब्रिटिश राजवटीपासूनमुक्त व्हावा यासाठी ते संपूर्ण आयूष्य झटत राहिले.

जॉन साँडर्स याची हत्या १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर येथे भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी मुंबईतील ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन साँडर्स याची हत्या केली होती. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA चे सक्रिय सदस्य होते. 23 मार्च 1931 रोजी त्यांना त्यांचे सहकारी भगतसिंग आणि सुखदेव थापर यांच्यासह ब्रिटीश सरकारने फाशी दिली. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन साँडर्स याची हत्या केली होती.

राजगुरुनगरराजगुरु यांच्या स्मरणार्थ त्यांचे खेड या जन्मस्थानाचे राजगुरुनगर असे नामकरण करण्यात आले. आजही तिथे शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मनार्थ अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

राजगुरू वाडा शिवराम हरी राजगुरु यांचा राहता वाडा राजगुरू वाडा या नावाने ओळखला जातो. ते त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. जिथे राजगुरूंचा जन्म झाला. पुणे नाशिक रोडवरील भीमा नदीच्या काठावर 2,788 चौरस मीटर क्षेत्रफळात त्यांचे गाव पसरलेले आहे. शिवराम राजगुरू यांच्या स्मरनार्थ त्यांच्या स्मारकाची देखभाल केली जात आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती HRSS ही स्थानिक संस्था 2004 पासून प्रजासत्ताक दिनी येथे राजगुरू यांच्या स्मारकाजवळ राष्ट्रध्वज फडकावत आहे.

लोकमान्य टिळकही प्रभावित झालेराजगुरू तिसर्‍या वर्गात शिकत असताना शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजगुरू यांनी भाषण दिले. त्यांच्या धाडसाने आणि शैलीने लोकमान्य टिळक प्रभावित झाले Lokmanya Tilak impressed by Rajguru .लोकमान्य टिळकांनी राजगुरूंना पुष्पहार घातला त्यांचा सन्मान केला. लोकमान्यांच्या भाषणाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता.शिवरायां सारखी धाडसी मुले असतील तरच स्वराज्याचे ध्येय साध्य होऊ शकेल. असे लोकमान्य म्हणाले होते. राजगुरू शंकराचार्यांनी इतके प्रभावित झाले होते की ते त्यांचे शिष्य बनले होते. शंकराचार्यांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक शुद्धीसाठी पाच दिवसांचे निर्जल उपवास करण्याची शिकवण दिली होती.

इंग्रजी भाषेची चिडराजगुरूंना संस्कृत ग्रंथ वाचायला आवडायचे त्याच वेळई त्यांना इंग्रजी भाषेची चिड यायची. पण त्यांचे बंधू दिनकर यांनी इंग्रजीचा आग्रह धरला होता. मला इंग्रजी सरकारचे काम करायचे नाही, मग त्याने इंग्रजी भाषा का शिकावी असे ते त्यांच्या भावाला स्पष्ट सांगायचे. 1924 मध्ये त्यांच्या परीक्षेचा निकाल लागला आणि त्यांना इंग्रजी भाषेत खूप कमी गुण मिळाले, त्यावर दिनकर यांनी त्यांना दोन वाक्य इंग्रजीत बोलण्यास सांगितले, अन्यथा त्यांनी घर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि इंग्रजी भाषेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर राजगुरू नाशिकला पोहोचले आणि तेथे राजगुरूंची आझाद आणि इतर क्रांतिकारकांशी ओळख झाली.

द मॅन ऑफ एचएसआरए राजगुरू यांना त्यांच्या शैली आणि नेमबाजी कौशल्यासाठी द मॅन ऑफ एचएसआरए ही पदवी देण्यात आली Rajguru The Man of HSRA. साँडर्सच्या हत्येनंतर राजगुरू नागपूर, अमरावती आदी भागात लपून राहिले. दरम्यान, डॉ. के.बी. हेडगेवार यांनी राजगुरूंची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी राहण्याची व्यवस्था केली. साँडर्सच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ते ब्रिटीश न्यायाधीशांना संस्कृत भाषेत उत्तर देत होते आणि भगतसिंग यांना त्याचे भाषांतर करण्यास सांगितले होते, असेही सांगितले जाते.

हेही वाचाDapoli Dahi Handi Festival गोविंदाचा नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, दापोली तालुक्यात दहीहंडी उत्सावावर शोककळा

Last Updated : Aug 20, 2022, 11:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details