मुंबई - राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांची नथुराम गोडसे ( MP Amol Kolhe in Naturam Godse movie ) भूमिका वादात सापडली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून विरोध होत असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अमोल कोल्हे यांना पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले, की डॉ. कोल्हे एक कलाकार आहेत. त्यांच्या भूमिकेकडे कलेच्या दृष्टीने पाहायला हवे, अशी भूमिका घेतली. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले ( Rajesh Tope on Nathuram Godse ) , की खासदार कोल्हे हे नथुराम गोडसे यांची ( MP Amol Kolhe in Naturam Godse movie ) भूमिका करत आहेत. हा 45 मिनिटांचा सिनेमा आहे. तो प्रदर्शित होत आहे. याबाबत एकच सांगायचे आहे, की अमोल कोल्हेंची खरी ओळख अभिनेता म्हणून ( MP Amol Kolhe as Actor ) आहे. ते लोकप्रिय आणि गुणी कलावंत आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. संभाजी मालिका हे सर्वजण पाहात असतात. आताही गोडसेंचा रोल असून एक अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहायला हवे, असे टोपे यावेळी म्हणाले.
Rajesh Tope Supports Amol Kolhe: नथुराम गोडसेंची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हेंना राजेश टोपेंचा पाठिंबा, म्हणाले... - आरोग्यमंत्री राजेश टोपे नथुराम गोडसे सिनेमा
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले ( Rajesh Tope on Nathuram Godse ) , की खासदार कोल्हे हे नथुराम गोडसे यांची ( MP Amol Kolhe in Naturam Godse movie ) भूमिका करत आहेत. हा 45 मिनिटांचा सिनेमा आहे. तो प्रदर्शित होत आहे. याबाबत एकच सांगायचे आहे, की अमोल कोल्हेंची खरी ओळख अभिनेता म्हणून ( MP Amol Kolhe as Actor ) आहे. ते लोकप्रिय आणि गुणी कलावंत आहेत.
मुलांची प्रतिकार शक्ती चांगली
देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्र लसीकरणात पुढे आहे. 15 ते 18 वयोगटातील 50 टक्के मुलामुलींचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. आता शाळा सुरू करू, तेव्हा ऊर्वरीत मुलांचे लसीकरण पूर्ण करून घेऊ, असे टोपे म्हणाले. तसेच कोरोनामुळे राज्यातील मुले बाधित होण्याची संख्या अधिक आहे. पण हा आकडा मोठा नाही. मुलांची प्रतिकार शक्ती चांगली असते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यासारखी स्थिती नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-Aslam Shaikh About Amol Kolhe : अमोल कोल्हे नथुराम गोडसेंच्या भुमिकेत; अस्लम शेख म्हणाले...