मुंबई- लसीकरण हा सध्या कळीचा मुद्दा आहे. आपण कोरोना निर्बंध शिथील करत चाललो आहे. तिसरी कोरोनाची लाट येण्याची चाहूल लागली तर तिच्यापासून वाचण्यासाठी लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की देशात 100 कोटी कोरोना लशींचे लसीकरण झाले आहे. यात राज्याचादेखील मोठा वाटा आहे. राज्यात 2 कोटी 90 लाख लोकांना कोरोना लशींचे डोस देण्यात आले आहेत. एकूण डोस देणाऱ्या राज्यांच्या यादीत आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. सध्या लशींची कमतरता नाही. केंद्र सरकार डोस उपलब्ध करून देत आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो, असेही आरोग्यमंत्री यांनी म्हटले आहे.