मुंबई -देशात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi Meeting With Uddhav Thackeray ) यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक आज बोलावली होती. या बैठकीत राज्यांमध्ये वाढणाऱ्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope Meeting With PM Modi ) हे देखील उपस्थित होते. ही बैठक पार पडल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद ( Rajesh Tope Press Conference ) साधत मासक्ती बाबत वक्तव्य केलं. तसेच राज्यात सध्या कोरोना परिस्थिती गंभीर नाही. मात्र, परिस्थिती गंभीर नसली तरी राज्य सरकार अलर्ट मोडवर असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
'मास्क सक्तीचा विचार सुरू' -25 हजारपर्यंत टेस्टिंग करत आहोत. हे टेस्टिंग वाढवत अहोत. आपलं राज्य सेफ झोनमध्ये आहे. सध्या 929 ॲक्टिव्ह केसेस आहेत. पर मिलियनमध्ये केसेस खूप कमी आहेत. दर लाखामागे राज्यात 7 केसेस असून, टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासोबतच ट्रॅकिंग सुद्धा आम्ही करणार आहोत. पॉझिटिव्ह केसेसचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मास्क सक्तीचा विचार सुरू आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून मास्कसक्की बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे संकेत त्यांनी दिले.