कोल्हापूर : माजी आमदार राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाताच, कोल्हापुरातील काही शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. यातच आज सकाळी क्षीरसागर यांचे अनेक ठिकाणचे पोस्टर्स फाडण्यात आले. शिवसेना नेते आणि माजी शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी हे पोस्टर्स फाडल्याने थेट गुवाहाटीमधून क्षीरसागर यांनी त्यांना इशारा दिला आहे. शिवाय तू जर गुंड असलास तर मीसुद्धा सुशिक्षित गुंड असल्याचे म्हणत पाळताभुई करून सोडेन, असा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे.
राजेश क्षीरसागर यांचा गुहाहाटीमधून कोल्हापूरातील शिवसैनिकला इशारा; म्हणाले मी सुशिक्षित गुंड - Eknath Shinde
माजी आमदार राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गोटात जाताच, कोल्हापुरातील काही शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. यातच आज सकाळी क्षीरसागर यांचे अनेक ठिकाणचे पोस्टर्स फाडण्यात आले. शिवसेना नेते आणि माजी शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी हे पोस्टर्स फाडल्याने थेट गुवाहाटीमधून क्षीरसागर ( Kshirsagar from Guwahati ) यांनी त्यांना इशारा दिला आहे. शिवाय तू जर गुंड असलास तर मीसुद्धा सुशिक्षित गुंड असल्याचे म्हणत पाळताभुई करून सोडेन, असा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे.
राजेश क्षीरसागर
जुना वाद यानिमित्ताने समोर : दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माजी शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले आणि माजी आमदार तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यात वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघेही एकत्र दिसायचे मात्र दोघांमध्ये अंतर्गत वाद समोर आले होते. दोनच दिवसांपूर्वी एक कॉल रेकॉर्डिंगसुद्धा समोर आले होते. त्यामुळे या निमित्ताने दोघांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.