मुंबई -संपूर्ण जगभरात कोरोना विळखा घातला असताना भारतीय समाज माध्यमांमध्ये कोरोना उपचाराबाबत चित्रविचित्र जाहिराती करून कोरोना बरा करण्याचा दावा केला जात आहे. कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करत असताना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनापासून प्रादूर्भाव होणार नाही, असा चुकीचा दावा करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.
कोणत्याही उत्पादकाने कोरोनावर औषध, उपाय असल्याचा दावा करणारी चुकीची जाहिरात केल्यास किंवा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आल्यास अशा उत्पादक, जाहिरातदार व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले आहे. कोरोनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई -