महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maha Assembly Speaker Election : महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लढवणारे राजन साळवी आहेत कोण?

विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे नाव निश्चित झाले आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ( MLA Rajan Salavi ) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर ( BJP MLA Rahul Narvekar ) आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.

Maha Assembly Speaker Election
राजन साळवी कोण आहेत

By

Published : Jul 2, 2022, 4:45 PM IST

मुंबई : सध्या राज्यात सत्तांतर झालंय. त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ( MLA Rajan Salavi ) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर ( BJP MLA Rahul Narvekar ) आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.

सलग तीन वेळा आले आहेत निवडून - राजन साळवी हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारणी आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून कोकण, महाराष्ट्र, भारतातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेवर 2009, 2014 आणि 2019 साठी सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

हेही वाचा -Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून युवा आमदार राहुल नार्वेकरांना उमेदवारी; जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

महाविकास आघाडीकडून राजीव साळवी उमेदवार - मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारे विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरले जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे राहुल नार्वेकर यांच्याशी लढत - राजन साळवी यांची आता शुक्रवारी उमेदवारी दाखल करणारे भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्याशी लढत होणार आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ३ जुलै रोजी होणार आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी गेल्या वर्षी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे.

हेही वाचा -Assembly Speaker Election : सत्तासंघर्षात अध्यक्षपद कोणाकडे जाणार? भाजप-सेनेमध्ये रस्सीखेच

3 आणि 4 जुलैला अधिवेशन - महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 3 आणि 4 जुलैला विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.

हेही वाचा - विधानसभा विरोधीपक्ष नेत्याच्या बाकावर कोण बसणार..?

ABOUT THE AUTHOR

...view details