मुंबई -वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात आणि वांद्रे पश्चिम येथे आशिष शेलार यांच्या विरोधात मनसेने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतही उमेदवार जाहीर केलेला नाही. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वरळीत नात्याला तर वांद्रेत मैत्रीला जागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज ठाकरे नात्याला वरळीत आणि मैत्रीला वांद्र्यात जागले
मनसेने ४५ उमेदवारांची दुसरी यादी प्रसीद्ध केली आहे. मात्र या यादीत वरळी आणी वांद्रे येथील विधानसभा मतदार संघात उमेदवार देण्यात आलेला नाही. यामुळे राज ठाकरे मैत्री आणि नात्याला जागल्याची चर्चा सर्वत्र आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 45 उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली आहे. यात नव्या चेहऱ्यांना स्थान दिले आहे. आतापर्यंत एकूण 70 उमेदवार मनसेने जाहीर केले आहेत. मात्र, आजच्या यादीतही मनसेने वरळीतून उमेदवार जाहीर केलेला नाही. यात मुंबईतून 7 उमेदवार दिले आहेत. तर विदर्भात राजुरा येथे कोकणात गुहागर, सावंतवाडी येथे उमेदवारी दिली आहे. काल जाहीर केलेल्या उमेदवारांना आज मनसेच मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे एबी फॉर्म देण्यात आले.