महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ban PFI: पीएफआय संस्थेवर केंद्र सरकारकडून बंदी! राज ठाकरेंनी केले शहांचे अभिनंदन - Ban PFI

पीएफआयवर केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घालण्या निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. (Raj Thakar congratulates Amit Shah ) यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी केले शहांचे अभिनंदन
राज ठाकरेंनी केले शहांचे अभिनंदन

By

Published : Sep 28, 2022, 7:08 PM IST

Updated : Sep 28, 2022, 7:35 PM IST

मुंबई -पीएफआय या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली याचे मी मनापासून स्वागत करतो. तसेच, अशी कीड जेव्हा-जेव्हा तयार होईल तेव्हा-तेव्हा ती तत्काळ समूळ नष्ट करायला हवी. (Ban PFI Organization For Five Years) या घेतलेल्या निर्णयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मी अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत - राज ठाकरे यांनी या संघटनेच्या घोषणाबाजीनंतर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा करण्याचा इशारा दिला होता. "एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या होत्या. सरकारने यांना वेळीच ठेचले पाहिजे. "तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा" ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, या गंभीर आरोपांखाली... थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत."ही कीड समूळ नष्टच करा" अशी थेट भूमिका राज यांनी व्यक्त केली होती.

यातच हिंदुस्थानाचे हित - फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही ! नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, यातच हिंदुस्थानाचे हित आहे." असा थेट इशाराच महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.

Last Updated : Sep 28, 2022, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details