मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कांचनगिरीजी आणि जगतगुरू यांनी भेट घेतली. यावेळी हिंदुत्वाच्या विषयावरती अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. या दोघांमध्ये झालेल्या भेटीनंतर राज ठाकरे हे कणखर हिंदुत्व मांडू शकतात. राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे, अशीच देशवासीयांची भावना आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. उत्तर भारतीयांबाबत कोणतेही गैरसमज नव्हते. ते माध्यमांनी निर्माण केले. यावरून आगामी निवडणुकांमध्ये देखील राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मत मागू शकतात अशी शक्यता आतापासूनच वर्तवली जात आहे.
राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे - बाळा नांदगावकर - etv bharat live
सोमवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कांचनगिरी, जगतगुरू सूर्याचार्य यांनी भेट घेतली. या भेटीत हिंदूराष्ट्र हा अजेंडा होता. राज ठाकरे यांच्यासारखा माणूस त्यांना हिंदूराष्ट्रासाठी योग्य वाटतो, असेही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
![राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे - बाळा नांदगावकर bala nandgavkar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13389963-644-13389963-1634565267087.jpg)
bala nandgavkar
राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे
सोमवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कांचनगिरी, जगतगुरू सूर्याचार्य यांनी भेट घेतली. या भेटीत हिंदूराष्ट्र हा अजेंडा होता. राज ठाकरे यांच्यासारखा माणूस त्यांना हिंदूराष्ट्रासाठी योग्य वाटतो. मध्यंतरी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. पण कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे तो दौरा रद्द करावा लागला. अयोध्येच्या आखाड्यातून अनेक लोक बोलावत आहेत. आजोबा, पणजोबापासून हिंदुत्व त्यांच्यात भिनलं आहे. राज ठाकरे हे कणखर हिंदुत्व मांडू शकतात. देशातून भावना आहे की राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे. उत्तर भारतीयांबाबत कोणतेही गैरसमज नव्हते. ते माध्यमांनी निर्माण केले. त्यावेळी राज्य विकासाला न्या ही एक भावना होती. 23 तारखेला भांडूपमधील मेळाव्यात सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, असंही नांदगावकर म्हणाले.
शिवसेनेला बसेल का फटका ?
2019मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यामध्ये आघाडी झाली. समविचारी पक्ष नसल्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व सौम्य झाल्याचे मत अनेकांनी मांडले होते. त्यानंतर ही हिंदुत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा चेहरामोहरा बदलला होता. थेट पक्षाचा झेंड्याचा रंग त्यांनी बदलला आहे. भाजपाही मनसेशी जवळकी साधत आहे. उघडपणे ही जवळीक दिसत नसली तरीही पडद्यामागून चर्चा सुरू आहेत. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना फटका बसू शकतो अशी शक्यता आहे.